लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेश राज्यात सोमवारी गंगा घाटावर सकाळी साडे आठ वाजता 40 लोकांना घेवून जाणारी बोट उलटल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून,
लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेश राज्यात सोमवारी गंगा घाटावर सकाळी साडे आठ वाजता 40 लोकांना घेवून जाणारी बोट उलटल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील बलियाजवळील माल्देपूर गंगा घाटावर ही घटना घडली आहे. स्थानिक लोकांनी तात्काळ मदत करत बुडणार्या लोकांना बाहेर काढले.
सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर एका महिलेला गंभीर अवस्थेत वाराणशीला हलवण्यात आले आहे. दोघांवर बलिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गडवार क्षेत्रातील सोनबरसा गावातील रहिवाशी नेपाल खरवंशी यांच्या नातवाचा मुंडन कार्यक्रम होता. यासाठी कुटूंबीय व नातेवाईक विधी पूर्ण करण्यासाठी नावेतून गंगेच्या दुसर्या किनार्यावर जात होते. नाविकाने काही अन्य लोकांनाही या कुटूंबाबरोबरच नावेत बसवले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बोटीमध्ये जवळपास 40 लोक सवार होते. नाव सुरू झाल्यानंतर केवळ पाच मिनिटातच बुडू लागली. नावेत पाणी घूसू लागले व नाव हेलकावे खाऊ लागली. योगायोगाने जवळच पूल होता. काही लोकांनी पुलाच्या रस्सीने अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढले. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. परिणामी ही बोट नदीच्या मध्यभागी उलटली. बोटीतले प्रवासी हे मुंडन समारंभात सहभागी झाले होते. बोट उलटल्यानंतर काही लोक पोहत बाहेर आले, तर घटनास्थळी उपस्थित लोकांनी लगेच नदीपात्रात उड्या मारून ज्यांना पोहता येत नव्हतं अशा काही लोकांना वाचवलं. लोकांनी ज्यांना नदीतून बाहेर काढलं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
COMMENTS