इम्फाळ/वृत्तसंस्था ः तब्बल साडेतीन महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असून, हा हिंसाचार अजून कमी होण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी पहाटे 5.
इम्फाळ/वृत्तसंस्था ः तब्बल साडेतीन महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असून, हा हिंसाचार अजून कमी होण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास उखरुलमधील लिटनजवळील थोवाई कुकी गावात गोळीबार झाला. त्यात गावातील 3 स्वयंसेवकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कुकी समुदायाची संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, मेईतेई लोकांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये जामखोगिन (26), थांगखोकाई (35) आणि हॅलेन्सन (24) यांचा समावेश आहे. हिंसाचारातून वाचलेल्या दोन महिलांच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाला, तो अजूनही सुरू आहे. या हिंसाचारात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. लिटन पोलिसांनी सांगितले की, पहाटे जोरदार गोळीबाराचे आवाज ऐकू आले. यानंतर पोलिसांनी आजूबाजूची गावे आणि जंगलात शोध घेतला. तेथून त्यांना तीन जणांचे मृतदेह सापडले. तिघांच्याही अंगावर धारदार चाकूने जखमेच्या खुणा असून त्यांचे हातपायही कापले आहेत.
COMMENTS