Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरातून एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातून एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यातील एक मुलगी अल्वयीन असून, ही घटना 14 मे रोजी घडली अ

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना घरातूनच अभिवादन करा- हिरे
पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार
संजीवनीच्या चार्वी कोठारीची प्रज्ञाशोधसाठी निवड        

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातून एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यातील एक मुलगी अल्वयीन असून, ही घटना 14 मे रोजी घडली असून, या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाणे व कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली.  
या बाबतची माहिती अशी की, सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवर राहणारे गरीब कुटुंबातील पतीपत्नी दोघे कामाला गेले असता त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरीच होती. सायंकाळी पत्नी घरी आली असता, तिची 17 वर्षीय मुलगी घरी घरातमध्ये कोठेही दिसुन आली नाही. तिच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेऊन नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती कोठेही मिळुन आली नाही. म्हणुन तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केलेबाबत खात्री झाली.मुलीचे वर्णन खालील प्रमाणे मुलीचे वय 17 वर्षे, दोन महिने  रंग-गोरा, उंची-5 फुट 1 इंच, नाक -सरळ, केस काळे लांब, अंगात- पिवळ्या रंगाचा टॉप,निळया रंगाची पॅन्ट निळया रंगाची ओढणी, गुलाबी रंगाची चप्पल असे वर्णनाची आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द भा द वी क 363 प्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली. दुसर्‍या घटनेत नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक परिसरातील 19 वर्षीय तरुणी घरातून किराणा सामान घेऊन येते  असे सांगून घराबाहेर गेली ती अद्याप घरी परतली नाही.  या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद केली.अधिक तपास  पोलिस हवालदार सोनवणे करीत आहे. हरवलेल्या मुलीचे वर्णन असे आहे रंग सावळा. उंची 4 फूट 10 इंच, शरीरबांधा सडपातळ, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे तरतरीत, अंगात काळा टॉप लेगिंग बुरखा घातलेला आहे. तिसर्‍या घटनेत केडगांव परिसरातील एकनाथ नगर कांदा मार्केटरोड, मराठामंदीर परिसरातील एक व्यावसायिक त्याच्या 22 वर्षीय मुलीच्या लग्नाबाबत घरच्यां सोबत चर्चा करत असतांना ती मुलगी घरातुन निघुन गेली. त्यानंतर तिने मोबाईल फोनवर मेसेज केला की, मला पाहु नका असा मेसेज केल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला मेसेज करुन विचारले की, तु कुठे आहेस त्यावर काहीएक उत्तर दिले नाही.अन तिचा फोन बंद लागला.त्यानंतर तिचा केडगाव परिसरात तसेच नगर शहरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठेही मिळुन आली नाही. त्यावेळी  खात्री झाली ती घरातुन कोठेतरी निघुन गेली आहे.  मुलीचे वर्णन असे आहे वय 22 वर्षे, केडगांव, रंग-गोरा, उंची 5 फुट 4 इंच, शरीर बांधा-सडपातळ, नाक- सरळ, चेहरा- गोल, डोळे- तरतरीत, पेहराव- पुर्ण शरीरावर पांढ-या रंगाचा कुर्ता, पायात चप्पल. या  प्रकरणी कोतवाली पोलिस  ठाण्यात  दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली असून कोतवाली पोलिस अधिक तपास  करीत आहे.

COMMENTS