नवी दिल्ली ः देशातील विविध राज्यात अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. आसामनंतर उत्तराखंडमध्ये देखील पावसाचा धुमाकूळ सुरू आहेत. आसाममध्ये ब्रह्मपुत्

नवी दिल्ली ः देशातील विविध राज्यात अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. आसामनंतर उत्तराखंडमध्ये देखील पावसाचा धुमाकूळ सुरू आहेत. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली गेली आहे. राज्यातील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असून 26 जिल्ह्यांतील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या सुमारे 17.17 लाखांवर आली आहे. उत्तराखंडमध्ये पूरस्थिती आहे. राज्यात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कुमाऊं भागातील पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा केला.
COMMENTS