Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोडीच्या घटनाची नोंद 

नागरिकात चोरट्यांची दहशत

अहमदनगर : तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दारू मटका जुगार गॅस रिफिलिंग,  सट्टा जुगार सायबर कॅफेबार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या पा

पावसाळयातील पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवा
के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणे पडले महागात

अहमदनगर : तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दारू मटका जुगार गॅस रिफिलिंग,  सट्टा जुगार सायबर कॅफेबार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या पाठोपाठ तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चोरी घरफोडी, वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी  यासारखे चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. या घटना रोखण्यास तोफखाना पोलीस प्रयत्न करीत आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात एकाच दिवशी तीन चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली.

कल्याण रोडवर भरदिवसा घरफोडी  15 तोळे दागिन्यासोबत रोकड लंपास  बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आता प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करून 15.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम, एक घड्याळ असा ऐवज चोरुन नेला. ही घटना नगर कल्याण रोडवरील प्रीमियम आयकॉन सोसायटी जिजाऊ नगर येथे घडली. 

याबाबतची माहिती अशी की सुरेश धोंडीबा औटी ( राहणार प्रीमियम आयकॉन सोसायटी प्लॉट नंबर 604 जिजाऊ नगर कल्याण रोड अहमदनगर) हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या मुलीला आणण्याकरता सकाळी सहा वाजता पुणे येथे गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडीकोंयंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील सामानाची उचकापाचक करून बेडरूम मधील कपाटातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, चार तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार , दोन तोळे वजनाची सोन्याची अंगठी, एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाची रोख रक्कम दहा हजार रुपये किमतीचे होशील कंपनीचे गोल्डन पट्टा असलेले हातातील घड्याळ, दहा हजार रुपये किमतीचा स्काय कंपनीचा टॅब दोन हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ, शैक्षणिक कागदपत्रे असा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सुरेश औटी यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 454, 380 अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. आणि तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

रासने नगर येथील घरफोडीत दागिन्यासह रोकड लंपास – बंद घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक करुन बेडरूम मधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने वाहनांची मूळ कागदपत्रे व चावी असा ऐवज करून नेला ही घटना सावेडी परिसरातील रासने नगर येथील प्रणव रेसिडेन्सी येथे घडली.  याबाबतची माहिती अशी की मारूतराव घुले पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण काशिनाथ पंधरकर ( वय 62 राहणार प्रणव रेसिडेन्सी रासनेनगर सावेडी अहमदनगर हे त्यांच्या हे त्यांच्या मूळ गावी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसे येथे कुटुंबासह शेतीच्या कामाकरता गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक केली बेडरूम मधील कपाटातील 1500 रुपये किमतीची गणपतीची चांदीची वीस ग्रॅम वजनाची मूर्ती 50 ग्रॅम वजनाचा क्रकंडा, दोन ग्रॅम वजनाचा सोन्याची नथ, अर्धा ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 1800 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, वीस हजार रुपये रोख रक्कम, चार चाकी ( क्रमांक एम एच सोळा बी एच 9297) व मारुती सुझुकी कंपनीचे कार (क्रमांक एम हेच 16 ए बी 1098) वाहनाची, व  मोटारसायकल चे मूळ कागदपत्र व चावी असा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अरुण पंधरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली.

सिध्दार्थनगर येथे खिडकीतून दागिन्याची चोरी – बंद घराच्या गज नसलेल्या खिडकीतून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आतील सोन्याचे दागिने मोबाईल रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला ही घटना लाल टाकी परिसरातील सिद्धार्थ नगर येथे घडली  याबाबतची माहिती अशी की येथील तेजल अजय खरात वय 23 राहणार गणपती मंदिराजवळ स्वस्त धान्य दुकानात शेजारी सिद्धार्थ नगर अहमदनगर.) या त्यांच्या कुटुंबासह घरात झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून हात प्रवेश केला घरातील किचन ओट्यावर ठेवलेल्या कोर्स मधील 35 हजार रुपये रोख रक्कम, एक हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी जे सिक्स मोबाईल पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाल्याची घटना खरात यांच्या सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तेजल खरात यांनी दिले. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

COMMENTS