Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघाचे कातडे विकणार्‍या तिघांना मुंबईत अटक

मुंबई : वाघाचे कातडे विकणार्‍या महाबळेश्‍वरच्या तिघांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. बोरिवली येथील एलआयसी मैदान परिसरात वाघाचे कातडे आणि वाघ नखे व

शेतकरी नवरा बायकोने केल विष प्राशन | LOKNews24
नीट समुपदेशन थांबवण्यास सर्वोच्च नकार
देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश

मुंबई : वाघाचे कातडे विकणार्‍या महाबळेश्‍वरच्या तिघांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. बोरिवली येथील एलआयसी मैदान परिसरात वाघाचे कातडे आणि वाघ नखे विकणार्‍या तिघांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून 114 सेमी लांब 108 सेमी रुंद आणि बारा वाघ नखे असा दहा लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वन्यजीव कायदा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संदीप आनंदराव परीट यांनी फिर्याद दिली असून सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30, रा. बिरवाडी ता. महाबळेश्‍वर) मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35, रा.रांजणवाडी महाबळेश्‍वर) व मंजूर मुस्तफा मानकर (वय 36 रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्‍वर ) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बॉम्बे यांना महाबळेश्‍वर येथील काही लोक वाघाचे कातडे एलआयसी मैदान परिसरात विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल यांच्या सूचनेनुसार मैदान परिसरात सापळा रचण्यात आल्या आणि तिघांनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाघाची कातडे आणि नखे जप्त करण्यात आली वाघ नखे आणि वाघाची कातडे असा दहा लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, अखिलेश बॉम्बे, प्रवीण चोपडे, संदीप परीट, प्रशांत ठोंबरे, गणेश शेरमाळे यांनी या कारवाईत भाग घेतला होता. या प्रकरणाची सातारा वनविभागाला कोणतीही माहिती नव्हती असे समोर आले आहे. आदिती भारद्वाज यांना याबाबत संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाईची दिशा निश्‍चित करण्यात आले असे त्यांनी सांगितले.

COMMENTS