मुंबई ः निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी मध्यरात्री ही

मुंबई ः निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कोणाची आहे, रक्कम कुठे जात होती, यासंदर्भात तपास सुरु आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. मात्र, तरी देखील अनेकांकडून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर शनिवारी (ता. 27) नाकाबंदीदरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका व्हॅनची तपासणी केली. यावेळी व्हॅनमध्ये तब्बल तीन ते साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळून आली.
COMMENTS