Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना धमकीचा फोन

जालना : राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी वडीगोद्रीत उपोषणाला बसलेले ओबीसी नेते न

आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री
तीन हजारासाठी पत्नीला उतरवले वेश्याव्यवसायात
म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास

जालना : राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी वडीगोद्रीत उपोषणाला बसलेले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकी देणार्‍याने तुला जिवंत राहायचे की नाही असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावेळी माझा फोन माझ्या सहकार्‍याकडे होता. परंतू मीच बोलतोय समजून धमकी देण्यात आल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.
नवनाथ वाघमारे हे देखील ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सोबत वडीगोद्रीत उपोषणाला बसले होते. दहा दिवस उपोषण झाल्यानंतर सगेसोयरे अध्यादेशाची लागलीच अंमलबजावणी केली जाणार नाही असे आश्‍वसान सरकारच्या शिष्ठमंडळाने त्यांना दिले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने या दोघा ओबीसी नेत्यांनी उपोषण मागे घेतले. आपण स्वत:हून पोलिस संरक्षण मागणार नाही जर पोलिसांना काळजी असेल तर ते देतील संरक्षण असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. आपल्याला झुंडशाही आणि जातीयवादी लोकांकडून अनेक वर्षापासून धमक्यांना येत आहेत. मात्र मी धमक्यांना घाबरत नाही असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात वडीगोद्री येथील ओबीसी समर्थकांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पोलीस प्रशासनाने सुरक्षा दिली तर आपण ती स्वीकारू असेही वाघमारे यांनी म्हटले आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेड निर्माण झाली असतानाच आता मराठा आंदोलकांनी संभाजीनगरात सोमवारी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली होती. डॉ. रमेश तारख यांनी आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याच्या आरोपावरुन तारख यांना काळे फासण्यात आले होते.

COMMENTS