राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

मध्यप्रदेशातील निनावी पत्रामुळे खळबळ

भोपाळ प्रतिनिधी - महाराष्ट्रात काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सावरकरविरोधी वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असतांनाच, रहाुल गांधींना बॉम्बने उड

वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत
पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे नववीतील चौदा वर्षीय मुलीने घेतला गळफास
आता गॅस सिलेंडरवर मर्यादा ; वर्षभरात केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार

भोपाळ प्रतिनिधी – महाराष्ट्रात काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सावरकरविरोधी वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असतांनाच, रहाुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असून यातच राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी इंदूरमध्ये पोहोचताच बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र इंदूर स्थित एका मिठाईच्या दुकानात आढळले आहे. यामुळे सुरक्षा पातळीवर मोठी खळबळ माजली आहे. भारत जोडो यात्रा जिथे विश्रांतीसाठी थांबणार आहे त्याठिकाणी हे पत्र आले आहे. हे पत्र कोणी दिले हे समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास आता पोलिस आणि क्राइम ब्राँचचे अधिकारी करत आहेत. जुने इंदूर पोलिस स्टेशनच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 24 नोव्हेंबर रोजी इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहे. त्याआधी आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आता पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात पोहोचणार आहे. तेथून ती उज्जैन व इंदूरमार्गे राजस्थानात जाईल. त्यातच आता राहुल यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे पत्र इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात आढळले. पोलिसांनी हे पत्र जप्त करून तपास सुरू केला आहे. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजही तपासले जात आहे. मिठाईचे दुकान जुन्या इंदूर शहरात आहे. पोलिसांच्या मते, धमकीचे हे पत्र एका अज्ञात व्यक्तीने दुकानात ठेवले. त्यानंतर दुकानदाराने ते पोलिसांना सुपूर्द केले. यासंबंधीच्या माहितीनुसार, राहुल इंदूर मुक्कामी शहरातील खालसा कॉलेजमध्ये थांबतील. तेव्हा त्यांना बॉम्बने उडवण्यात येईल असा पत्रात उल्लेख आहे. पत्र लिहिणार्‍या व्यक्तीने आपण शिख समुदायाचे असल्याचा दावा केला आहे. या पत्रात त्याने इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिख विरोधी दंगलीचाही उल्लेख केला आहे. पत्राच्या शेवटी एक दूरध्वनी क्रमांक लिहिण्यात आला आहे. पोलिस त्याचा तपास करत आहेत. त्या दिवशी संपूर्ण इंदूर शहर स्फोटांनी हादरेल, असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. पोलिस या धमकीचा गांभिर्याने तपास करत आहेत.

तुषार गांधी यांनी केले सावरकरविराधी वक्तव्याचे समर्थन – तुषार गांधी शुक्रवारी शेगावमध्ये राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले. यावेळी बोलतांना तुषार गांधी म्हणाले की, सत्य सांगण्याचे धाडस असायला हहवे. राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी मांडलेले मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचे नाही. सत्य सांगायचे धाडस असायलाच हवे. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसते. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवले, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाहीये हे कळून येते, असेही तुषार गांधी म्हणाले.

COMMENTS