Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर ः कन्नड प्रांतातील इ.स.1131 ते1196 या काळातील महात्मा बसवेश्‍वर आणि महाराष्ट्रातील22 सप्टेंबर1887 ते09 मे1959 या काळातील कर्मवीर भाऊरा

डॉ. बखळे यांचा धाडसीपणा युवकांसाठी प्रेरणादायी ः प्राचार्य शेळके
विवेकी उपक्रमशीलता नव्या उपक्रमाला जन्म देते ः प्राचार्य शेळके
गुणवत्ता आणि संस्कार हीच शिक्षणाची खरी ओळख ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर ः कन्नड प्रांतातील इ.स.1131 ते1196 या काळातील महात्मा बसवेश्‍वर आणि महाराष्ट्रातील22 सप्टेंबर1887 ते09 मे1959 या काळातील कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांचेही जीवन व कार्य समाज कल्याणकारी आणि क्रांतिदर्शक विचारांचे होते, या पुरोगामी महामानववांचे आदर्श कार्य, विचार आजच्या समाजात रुजले पाहिजेत, अशी अपेक्षा अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर येथील मेनरोड आझाद मैदान आगाशे सभागृहात विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान व वीरशैव लिंगायत समाज तालुका श्रीरामपूर तर्फे महात्मा बसवेश्‍वर यांची893 वी जयंती आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची65 वी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य टी.ई. शेळके बोलत होते. विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करुन पाहुण्यांचा सत्कार केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, घनःश्याम राजपाठक, वीरशैव लिंगायत समाजाचे तालुका अध्यक्ष विशाल निकाडे, प्रा.डॉ. अभिजित मंचरकर, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे यांनी महात्मा बसवेश्‍वर आणि प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. अभिजित मंचरकर, घनःश्याम राजपाठक यांनी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे सामाजिक कार्यातील मौलिकत्व स्पष्ट केले. काळाच्या पुढे असणारे महात्मे समजून घेतले पाहिजेत तरच समाजात सतसंस्कृती निर्माण होईल असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्राचार्य शेळके यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. यावेळी प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. शिवाजी काळे, मुख्याध्यापक चव्हाण, सुदामराव औताडे, सुरेश बुरकुले, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, महिलावर्गआदी उपस्थित होते. बाळासाहेब बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, साहेबराव सुकळे, दिनेश वाडणकर आदिंनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर अड़ सतिश डोंगरे यांनी आभार मानले.

COMMENTS