Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही – बावनकुळेंचा दावा

मुंबई ः घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच तर त्यांचा पक्ष त्यांच्या हातातून गेला. वास्तविक उद्धव ठाकरे यांना पक्ष च

शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.
’आषाढी’निमित्त टोल वसुली पुढे ढकला
राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार शिल्लक ठेवू नका

मुंबई ः घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच तर त्यांचा पक्ष त्यांच्या हातातून गेला. वास्तविक उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवयच नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचा दरारा आणि त्यांचे काम, याचे आम्ही तीस वर्षांचे साक्षीदार आहोत, ते आता राहिले नाही. अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना इतके लोक सोडून गेले, त्यावेळी देखील ते काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील उद्धव ठाकरे थांबवू शकणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पक्ष चालवण्यासाठी घराब बसून न राहता, अठरा तास काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. इतकच नाही तर 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर केवळ चार ते पाचच लोक दिसतील असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावरही या वेळी टीका केली. शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे सांगण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले. ओबीसी समाजाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच न्याय मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्राची विश्‍वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय निर्माण करण्याचे सुचविले नाही? त्याचे कारण काय? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

COMMENTS