अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांनी माझ्यावर जाणीपूर्वक आरोप करू नये : माजी नगरसेवक बंडू बोरुडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांनी माझ्यावर जाणीपूर्वक आरोप करू नये : माजी नगरसेवक बंडू बोरुडे

अभिजित खंडागळे/पाथर्डी : मागील तीन चार दिवसांपूर्वी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारानी पत्रकार परिषदेत जे कौतूक मांडल ते हास्यास्पद आहे.त्यांनी विरोधक

भाजपा यु वा मोर्चाने हर घर तिरंगा उपक्रमाची जबाबदारी यशस्वी पार पाडली- आमदार मोनिका राजळे
खैरी निमगांव रस्त्यावर केबल कंपनीचे नियमबाह्य खोदकाम
कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात

अभिजित खंडागळे/पाथर्डी : मागील तीन चार दिवसांपूर्वी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारानी पत्रकार परिषदेत जे कौतूक मांडल ते हास्यास्पद आहे.त्यांनी विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर आजपर्यंत केलेल्या विकासकामातून द्यायला हवे होते.परंतु त्यांची पत्रकार परिषद आमच्यावर टीका करण्यातच संपली.मला वरिष्ठ नेत्यापासून ते कार्यकर्ताकडून भूमाफिया,गुंड,असे नाव मला दिले जाते.मी शेतकरी कुटूंबातून व्यवसाय करत पुढे आलो आहे.आज मी पंधरा वर्षे नगरसेवक पदावर असून,आजपर्यंत कोणालाही दोन बोट लावले असतील तर सांगा मी गाव सोडून जाईल.जमीनीचा व्यवहार करणे त्यातून पैसे कमवणे हा माझा व्यवसाय आहे.तसेच मी जर काही बेकायदेशीर केले असेल तर ते सिद्ध करून दाखवा मी त्यांची शिक्षा भोगायला तयार आहे.परंतु जाणीपूर्वक तुमच्याकडे काही सांगायला नाही म्हणून तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करू नका.मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नव्हती.पण माझ्यावर ज्या पद्धतीने आरोप केले जातात.त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.ते काही धुतल्या तांदळाचे नाहीत.तुमचे शहरात काही सामाजिक कार्य नसून तुम्ही अपघाताने नगराध्यक्ष झाले आहात.तुमचं अक्यूचिली अक्यूचिली करून चालेलं आहे.तुमचं भागल आहे.ते भागून घ्या.सांगण्यासारखे भरपूर आहे.वेळ आल्यावर सांगू.आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर निश्चित आमच्यावर आरोप करा त्याबद्दल आम्हाला राग नाही.तसेच यापुढील काळात आमच्यावर या पद्धतीने टीका केली तर यापेक्षाही यांची अजून पार्श्वभूमी आमच्याकडे आहे.तीन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने शासकीय विश्रामगृह घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बंडू बोरुडे यांच्यावर करण्यात आलेल्या टिकेला उत्तर देताना ते महविकास आघाडीच्या वतीने
शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बंडू बोरुडे,तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सविता भापकर गहिनीनाथ शिरसाठ,राजेंद्र खेडकर,किरण खेडकर,बन्सी आठरे,शिवसेनेचे भाऊसाहेब धस,भगवान दराडे,सीताराम बोरुडे,देवा पवार,चांद मणियार,रोहित पुंड,योगेश रासने, वैभव दहिफळे, सागर ईधाटे, चंद्रकांत भापकर, दिगंबर गाडे, राजेंद्र नागरे, राजेंद्र जगताप,हुमायून आतार,अक्रम आतार,बबलू शिरसाठ,काँग्रेसचे काटे सर,किशोर डांगे,शिवाजी मरकड आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,आमच्या पक्षाने निवडून आणलेले नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी यांना निवडून दिले होते.परंतु यांनी मागणी नसलेले कामे करत ज्या कामात मलिदा आहे ती कामे केली.खुले नाट्यगृहाच्या कामात काही रक्कमेची वर्क ऑर्डर नसतानाही त्यांनी ते कामे केले.गेल्या पाच वर्षात शहरातून वावरत असताना नगराध्यक्ष यांच्या ओपीडी मध्ये सामान्य माणूस नाही तर एक ठेकेदाराची टोळी कायम उपस्थित होती.त्याच्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न व गटारीचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही.दुसऱ्याच्या नावावर असलेल्या अध्यक्षाच्या गाडीच हजारोच बिल काढण्यात आले.सत्ताधरी नगरसेवक ठेकेदारी करतात.घनकचराच्या पैशाचा ताळमेळ नाही.आरोग्य,मुरूम ठेका,एलीईडी दिवे ठेका,तीर्थक्षेत्र काम,जे.सी.बी.यावर त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी म्हटले की,मागील आठवड्यात आम्ही नगरपालिका,पंचायत समितीतील भ्रष्टाचाराबाबत तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर पत्रकार परिषद घेतली होती.त्यावर उत्तरे देण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पत्रकार परिषदेत हजर राहून चूक कबूल करून याबाबत बोलायला हवे होते.पण तस न करता त्यांनी पत्रकारच्या प्रश्नांच्या भडिमारातून वाचण्यासाठी पत्रकार परिषदेतुन पळ काढला.तीन दिवसांपूर्वी भाजपच्या पत्रकार परिषदेतून लोकप्रतिनिधी त्यांच्या पदाधिकारांना समर्थन करत पाठबळ देण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे अपेक्षित होते.पण दुसऱ्याच गोष्टी त्यांनी मांडल्या.त्यामुळे आम्ही आज पुन्हा पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत असल्याचे म्हटले. पंचायत समिती सदस्य पती किरण खेडकर यांनी यावेळी आपले मत मांडतांना म्हटले की,गेल्या पाच वर्षांपासून पंचायत समिती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्या ठिकाणी गोरगरिबांचे काम होत नसून काम करण्यासाठी कमिशन घेतले जाते. आमच्या नेत्यांनी १५ कोटीचा निधी भालगाव गटात आणला आहे.आजपर्यंत कोणत्याही गटात एवढा निधी कोणी आणल्याचे जाहीर करावे.ज्यांच्या पिढ्यानापिढ्या राजकारणात सक्रिय आहेत.त्यांना नारळ फोडण्याची गरज नाही.जिल्हापरिषद गटाच्या सदस्यांच्या पत्राद्वारे व पालकमंत्री यांच्या सहीने मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे तुम्ही रात्रीतून उदघाटन करता ही खेदजनक असून श्रेयवादासाठी हे हापलेले आहेत. ज्यावेळी मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आली तेंव्हा ती तोट्यात होती.ती आम्ही नफ्यात आम्ही आणली.मार्केटचे पाथर्डीत ३६ भूखंड आहेत.त्यापैकी २० भूखंड त्यांनी आधीचे दिले होते.१६ भूखंडापैकी ८ भूखंड आजही असल्याचे वैभव दहिफळे यांनी सांगितले. महिला तालुका अध्यक्ष सविता भापकर यांनी म्हटले की,त्यांच्या नेत्यांना कोरोना झाला असताना आम्ही देवाकडे त्याच्याबद्दल शुभकामना केली.परंतु महिला अध्यक्ष पदावर एक महिला असतांना त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मला खंत वाटते.आमचे नेते अड प्रताप ढाकणे व प्रभावती ढाकणे यांना कोरोना झाला असतानाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज करत तालुक्यातील जनतेसाठी कोविड सेंटर चालू करत दिलासा देण्याचे काम केले.तसेच येणाऱ्या निवडणुकीत आमचीच सत्ता येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मार्केट कमिटी मध्ये बैल बांधायला जागा राहिली नाही.असे मत विरोधकांनी व्यक्त केले परंतु त्यांना आमचं सांगण आहे की आम्ही कुठल्याही नवीन लेआउट बनवला नसून,तुमच्या कार्यकर्त्यांनी मार्केट कमिटीच्या शेवगाव रोडवर अतिक्रमण केले आहे.ते का हटवले जात नाही असा प्रश्न यावेळी माजी सभापती गहिनाथ शिरसाठ यांनी उपस्थित केला.

COMMENTS