प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

हर हर महादेवच्या दिग्दर्शकाची मागणी

 इतिहासाची मोड तोडून शिवाजी महाराजांवरचे सिनेमे तयार केले जात असल्याचा आरोप करत हर हर महादेव या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला. कालपासून पुणे त्यानंतर ठ

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक
राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शब्द

 इतिहासाची मोड तोडून शिवाजी महाराजांवरचे सिनेमे तयार केले जात असल्याचा आरोप करत हर हर महादेव या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला. कालपासून पुणे त्यानंतर ठाण्यात हर हर महादेव सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन प्रेक्षकांना थिएटर बाहेर काढलं. तसंच प्रेक्षकांनी सिनेमा पाहू नये असं आवाहन देखील केलं. इतिसाहाची मोड तोड करून सिनेमा तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप हर हर महादेव सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे(Abhijeet Deshpande) यांनी केला आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची आणि प्रेक्षकांची माफी मागावी अशी मागणी देखील अभिजीत देशपांडे यांनी केली आहे.

COMMENTS