Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात व कोल्हे समर्थकांनी घेतली खा. शरद पवारांची भेट

Oplus_131072 राहाता ः गणेश परिसरातील आमदार बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे गटाच्या समर्थकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प

संजीवनीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र  संघात निवड
लोकशक्ती आघाडी धरणग्रस्तांच्या पाठीशी ः माळवदे
यंदा पावसासोबत चक्रीवादळाचा धोका अधिक
Oplus_131072

राहाता ः गणेश परिसरातील आमदार बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे गटाच्या समर्थकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची  बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीत गणेश सहकारी साखर कारखाना संदर्भात येणार्‍या विविध अडचणी बाबत चर्चा करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अडचणी सोडवण्याबाबत विनंती करण्यात आली.
जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठ्याबाबत कारखान्याला येत असलेल्या अडचणी, उसाची कमतरता, कार्यक्षेत्रातील उसाची होत असलेली पळवापळवी, गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातील पाणीटंचाई, शंभर वर्षांपूर्वीच्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था, शेती सिंचनाचे अनियमित व कमी झालेली आवर्तने, कालव्यांचे रुंदीकरण व वाहन क्षमता, दैनंदिन गळीत हंगामा दरम्यानच्या समस्या, दुष्काळाचे सावट, दुधाचे दर, कामगारांना भेडसावणार्‍या समस्या या भेटी दरम्यान शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. पवार यांनी जवळपास अर्धा तास वेळ देऊन सविस्तर चर्चा केली. शिर्डी विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीचा मेळावा घ्यावा अशी विनंती पवार यांना यावेळी करण्यात आली तेव्हा त्यांनी तुम्ही मेळाव्याचे नियोजन करा, मी मेळाव्यास उपस्थित राहील असे आश्‍वासन पवार यांनी दिले असल्याचे अनिल बोठे यांनी सांगितले. या प्रसंगी माजी आमदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, गणेशचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले पाटील, माजी संचालक आप्पासाहेब बोठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष  संदीप वरपे, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, गणेशचे संचालक नानासाहेब नळे, संचालक बाळासाहेब चोळके, संचालक संपत हिंगे, राष्ट्रवादीचे युवा नेते अनिल बोठे, धीरज कार्ले, निलेश कार्ले आदी उपस्थित होते.

COMMENTS