Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप ट्रान्सपोर्ट सेल व कामगार युनियनच्या तालुकाध्यक्षपदी ठोंबरे

सुपा : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दीपक ठोंबरे यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (पारनेर तालुका) या संघ

सुपा येथे महाशिवरात्री उत्साहात
पत्रकार हे घेणारे नाही; तर देणारे : डॉ.आरोटे
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्रास भेट

सुपा : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दीपक ठोंबरे यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (पारनेर तालुका) या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य भाजप ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष विजय हरगुडे आणि संघटनेचे संस्थापक अनुप मोरे यांनी जाहीर केली असून, निवडीचे अधिकृत पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. ते ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात. निवडीनंतर पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी ठोंबरे यांचा सन्मान करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे तालुक्यातील कामगार विभागातील भाजपची संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.भाजपच्या माध्यमातून पक्ष संघटनेसाठी अधिक जोमाने काम करेन. ट्रान्सपोर्ट सेलमधील कामगारांच्या विविध समस्या व हक्कांसाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने प्रयत्न करेन. सर्वसामान्य कामगार बांधवांच्या कल्याणासाठी हे पद निष्ठेने वापरेन असे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक ठोंबरे यांनी सांगितले.

COMMENTS