Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी ठोळे, उपाध्यक्षपदी लोहकरे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव पिपल्स को-ऑप. बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीनंतर चेअरमन व्हा. चेअरमन पदाचे निवडीकरीत

वर्षा सुरासे-साळुंकेंना उत्कृष्ट योग शिक्षिका पुरस्कार
माशाचा तुकडा न वाढल्यानं लग्नात मारामारी; 11 जखमी
राहुरी तालुक्यातील निळवंडे कालव्यांचे काम सुरू करा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव पिपल्स को-ऑप. बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीनंतर चेअरमन व्हा. चेअरमन पदाचे निवडीकरीता जिल्हा उपनिबंधक  यांचे अधिसुचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहा. निबंधक एन.जी. ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अध्यक्ष पदाकरीता कैलासचंद भागचंद ठोळे यांचे नावाची सुचना कल्पेश जयंतीलाल शहा यांनी मांडली त्यास अतुल धनालाल काले यांनी अनुमोदन दिले.
उपाध्यक्ष पदाकरीता भाउसाहेब शंकरराव लोहकरे यांचे नावाची सुचना रविंद्र रतनचंद ठोळे यांनी मांडली त्यास राजेंद्र मोतीलाल शिंगी यांनी अनुमोदन दिले.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता एक एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  एन.जी. ठोंबळ यांनी जाहिर केले.बॅकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे हे गत 45 वर्षांपासून बँकेचे संचालक पदावर असुन त्यांनी सन 1981-82 मध्ये व्हा. चेअरमन पद व सन 1992 व 2009-10 मध्ये चेअरमन पद देखील भुषविलेले आहे. कैलासचंद ठोळे हे कोपरगांवातील प्रसिध्द उदयोगपती असुन त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डी आर मेहता यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या अग्रीकल्चर व फर्टीलायझर डिलर्सचे कर्जसमितीवर सदस्य म्हणून दोन वर्ष, महाराष्ट्र फर्टीलायझर अ‍ॅण्ड पेस्टीसाईड डिलर्स असो. राज्यव्यापी संघटना, पुणे या संस्थेचे 27 वर्ष अध्यक्षपदी, मध्य रेल्वेचे कन्सल्टीव्ह समीती वर दोन वर्ष, जिल्हा नागरी बँक असो चे चेअरमनपदी, ऑल इंडिया प्लॉस्टीक मॅन्यु. असो. मुंबईचे संचालकपदी, फर्टीलायझर अ‍ॅडव्हायजरी फोरम, नई दिल्ली चे सदस्य असे विविध क्षेत्रातील पदांवरील कामकाजाचा अनुभव त्यांना आहे. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विदयमान अध्यक्षपदाचा कार्यभारही ते सांभाळत आहे . बँकेचे नुकतेच झालेल्या पंचवार्षीक निवडणूकीत सुनील कंगले, रविंद्र लोहाडे, कल्पेश शहा, धरमचंद बागरेचा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सुनील बंब, सत्येन मुंदडा, रविंद्र ठोळे, सुनील बोरा, दीपक पांडे, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, प्रतिभा शिलेदार, त्रिशला गंगवाल हे नवनिर्वाचित संचालक सभेस उपस्थित होते. बँकेचे मावळते चेअरमन सत्येन मुंदडा व व्हा. चेअरमन प्रतिभा शिलेदार यांनी त्यांचे कार्यकाळात संचालक व सेवकांनी केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त केले. सहकार अधिकारी ए आर रहाणे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, सिनी. ऑफीसर विठ्ठल रोठे उपस्थित होते शेवटी अहमदनगर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी प्रदीप नवले यांनी बँकेचे सेवकांचे व युनियनचे वतीने सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला.

COMMENTS