Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा महिनाभर आधीच केशर आंबा बाजारात

पुणे : राज्यातील केशर आंबा साधारण एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीस बाजारात येतो. मात्र, यंदा मार्चअखेरीस केशर बाजारात दाखल झाला असून, एप

कराडच्या प्रशासकीय इमारतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना प्रवेश बंद
कोपरगावमध्ये अवयवदान कार्यशाळा उत्साहात
चिंचोली कुस्ती मैदानात दत्ता बानकर नंबर वन; मैदानात मल्लविद्या केंद्र शेडगेवाडीच्या मल्लाचे वर्चस्व

पुणे : राज्यातील केशर आंबा साधारण एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीस बाजारात येतो. मात्र, यंदा मार्चअखेरीस केशर बाजारात दाखल झाला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोठ्या प्रमाणावर केशर आंबा बाजारात उपलब्ध असेल. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशर आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे.
केशरला 150 ते 170 रुपये किलो दर मिळत आहे. केशर मार्चच्या अखेरीस किरकोळ प्रमाणात बाजारात आला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर केशर बाजारात दाखल होईल. यंदा केशरला चार-पाच टप्प्यात मोहोर आला आहे. एकाच झाडावर काढणीला आलेला, पक्व झालेला आंबा, कैरी स्वरुपातील आंबा, लिंबाच्या आकाराचा आंबा आणि नुकताच मोहरातून बाहेर येऊन लिंबोळीच्या आकाराचा आंबा दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील मोहरापासून आलेल्या आंब्याची काढणी पंधरा एप्रिलपासून सुरू झाली आहे. यंदा मार्चच्या मध्यापासून जूनअखेरपर्यंत केशर आंबा बाजारात असेल, अशी माहिती महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोकण वगळता राज्यभरात केशर आंबा लागवडीखालील क्षेत्र सुमारे 53,000 हेक्टरवर आहे. प्रत्यक्षात, फळ देणारी झाडे फक्त पंधरा हजार हेक्टरवर आहेत. बाकी शेतकर्‍यांनी फक्त अनुदान मिळवण्यासाठी आंब्याची लागवड केली किंवा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे झाडे जळून गेली आहेत. यंदा सरासरी इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलअखेरपर्यंत बाजारात हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. या कैळात अन्य जातीचे आंबे बाजारात कमी प्रमाणात असल्यामुळे हापूस आंब्यांना चांगला दर मिळतो. मात्र, यंदा एप्रिलपासूनच केशर आंबा बाजारात दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशरचा पर्याय उपलब्ध असणार आहे. बाजारात हापूस आणि केशरची स्पर्धा होणार आहे. सध्या केशर 150 ते 170 रुपये किलो तर हापूस 800 ते 1500 रुपये डझन आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

COMMENTS