Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हे राजकीय व्यासपीठ नव्हे : अभिजीत पाटील यांचा इशारा

जयंत पाटील यांच्या विकृत कार्यपध्दतीची पुराव्यासह तक्रार योग्यवेळी उच्च न्यायालयात दाखल करुइस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंट

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा आज 10 वा दीक्षांत सोहळा; 1227 विद्यार्थी होणार पदवीने सन्मानीत
मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत
मुसळधार पावसाने काठी शाळेची संरक्षण भिंत जमीनदोस्त

जयंत पाटील यांच्या विकृत कार्यपध्दतीची पुराव्यासह तक्रार योग्यवेळी उच्च न्यायालयात दाखल करु
इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर व सहकारी स्टाफवर दाखल झालेले दोन्ही गुन्हे हे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावामुळे झाले आहेत. जयंत पाटील यांची व्देषाची कार्यपध्दत सांगली जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. जयंत पाटील यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप काय आहे हे योग्य वेळी उच्च न्यायालय व राज्यपाल यांच्याकडे पुराव्यासह मांडला जाणार आहे. जरा दम धरा. हा लढा कामगारांच्या अस्तित्वासाठी व न्याय हक्कासाठी आहे. शहाजी पाटील हे राजकीय व्यासपिठ नाही, असा इशारा प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिला.
अभिजीत पाटील पुढे म्हणाले, अकार्यक्षम व बालनेते म्हणुन शहरात ओळख असणार्‍या शहाजी पाटील यांनी विकृत विचार घेऊन काम करणार्‍या जयंत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा असल्याची वल्गना करु नये. त्यांचे व्देषाचे व कुटनितीचे राजकारण संपुर्ण सांगली जिल्ह्याला माहीत आहे. जयंत पाटील यांचा काय संबध म्हणुन सवाल करणार्या अकार्यक्षम व बालनेते शहाजी पाटील यांनी पहील्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी पुढे पुढे करायला होता. दुसर्‍या गुन्हा दाखल करणारे योगेश खोत हे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत हा योगा योग कसा? यावर चिंतन करावे. 1515 कोरोना रुग्णांवर आम्ही उपचार केले. लोकांसाठी जयंत पाटील यांना काय करता आले नाही. आपण तर कोरोना काळात आपल्याला ज्यांनी निवडुन दिले त्यांना ही दिसला नाही. आम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. यामध्ये आमचे दोन सहकारी आम्हाला सोडून कायमचे गेले. यांचे दु:ख काय असते हे तुम्हांला व जयंत पाटील यांना समजणार नाही. राजकीय विरोधकांचे चांगले काम जयंत पाटील यांना चांगले खुपते. स्वच्छ मनाचे असते तर तालुक्यात व जिल्ह्यात अनेक चांगल्या संस्था उभा राहिल्या असत्या. सर्वसामान्य जनता दहशतीखाली राहिली नसती.
कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये सातत्याने सरकारी अधिकारी यांच्याकडून तपासण्या केल्या जात होत्या. लेखाधिकारी व लेखापरीक्षक अशी दोन सरकारी कर्मचार्‍यांची नेमणुक रुग्ण व नातेवाईकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व रुग्णांचे होणार्‍या बिलाचे ऑडीट करण्यासाठी केली होती. त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापन बिल भरुन घेत होते. आम्ही केलेली सेवा हि निस्वार्थपणे केली आहे. अनेक रुग्ण व नातेवाईकांनी सेवेबाबत अभिप्राय देवून समाधान व्यक्त केले आहे. आमचा न्याय देवतेवर विश्‍वास आहे. आम्हाला न्याय मिळेल, राजकीय कुरघोडीमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, यांची परतफेड जनता करेल. जयंत पाटील यांच्या कर्तबगारीवर बोलताना शहाजी पाटील यांनी थोडे पाठीमागे वळून पहावे. जयंत पाटील यांना जनतेच्या विकासाबाबत तळमळ असती तर स्व. विलासराव शिंदे, स्व. डॉ. एन. डी. पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे साखर कारखान्याचे स्वप्न पुर्ण होऊन तालुक्यात सुबता आली असती. सुर्वोदय सारखा कारखाना हिसकावुन घेण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या जय हनुमान पतसंस्थेने सेतू चालविण्यासाठी घेण्याचा प्रस्ताव दिला तो तुम्हाला जयंत पाटील यांनी न मिळु देता तो राजारामबापू ज्ञानप्रबोधनीला मिळवुन दिला होता. आता निशिकांत पाटील यांच्या संस्था बंद करण्याचा खटाटोप सुरु आहे. पण आम्हाला राजकारणाशी कोणतेही देणे-घेणे नाही. कोणी राजकारण करुन आम्हा कामगारांची अर्थिक दृष्ट्या कुटुंब उध्दवस्थ करुन उपासमारीची वेळ आणणार असेल तर हा कामगार पोटतिडकीने आक्रमक लढा उभारेल. हा उद्रेक कोठे पोहचेल हे त्याचवेळी समजेल, असा इशारा शेवटी अभिजीत पाटील यांनी दिला.

COMMENTS