हे सरकार घटनाबाह्य आहे – संतोष जाधव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हे सरकार घटनाबाह्य आहे – संतोष जाधव

नवी मुंबई प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद रा

आ. जयंत पाटील यांच्याकडे राज्याला नवी दिशा देण्याची क्षमता : राज्य प्रवक्ता नितेश कराळे
सत्ताबदल अटळ, परंतु..!
रस्त्याच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण

नवी मुंबई प्रतिनिधी – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले. नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केलेल्या अपिलावर घेतलेल्या सुनावणीनंतर राजभवनाने हे स्पष्टीकरण दिले आहे. जाधव यांनी यासंदर्भात ८ ऑक्टोबर २०२२ रोजी मागविलेल्या माहितीवर राजभवनाने त्यांना सत्तास्थापनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दिलेल्या पत्राची छायांकित प्रत दिली होती. मात्र, आपणास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची छायांकित प्रत मिळावी, असे अपिल जाधव यांनी केले हाेते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे. राजभवनाच्या या स्पष्टीकरणानंतर विधीमंडळ सचिवालयाने कोणत्या पत्रांन्वये आणि कोणत्या अधिकारात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी घेतला, असा प्रश्न करत हे सरकार घटनाबाह्य असल्याची प्रतिक्रिया संतोष जाधव यांनी व्यक्त केला आहे. 

COMMENTS