Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या जयंती उत्सवांचा हा कालखंड प्रेरणादायी भारावून टाकणारा-प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर

बीड- महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याचा जयंती उत्सव दोन दिवसांच्या अंतराने येत असल्याने हा कालखंड मोठा प्रेरणादायी

अवकाळीच्या कळा !
मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात
हृतिक रोशन आणि सबा आझादचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल

बीड– महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याचा जयंती उत्सव दोन दिवसांच्या अंतराने येत असल्याने हा कालखंड मोठा प्रेरणादायी भारावून टाकणारा आहे. दोघांचा जीवन कालावधी एकच नव्हता पण ज्योतिबा फुले यांचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याने त्या संघर्षाच्या काळात आंबेडकरांनी त्यांना आपल्या गुरुस्थानी मानले होते असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या समग्र जीवन या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपयुक्त श्री. जगदाळे , सहायक आयुक्त (समाज कल्याण) रवींद्र शिंदे, जिल्हा कारागृह विभागाचे अधिकारी तसेच प्राचार्य श्री.रोडे तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थिती होती.  प्रा डॉ. लुलेकर म्हणाले, पारतंत्र्याच्या काळात शिक्षणाचे मुहूर्तमेढ करताना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली शाळा इतकी आदर्श होती, की त्या काळातील इंग्रज सरकारच्या सरकारी शाळांपेक्षा ज्योतिराव फुले यांनी काढलेली शाळा उत्तम असल्याने तेव्हाच्या सरकारी शाळात विद्यार्थी जाणे बंद होतील की काय अशी स्थिती झाली होती. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी आधुनिक समाजनिर्मितीमध्ये अमुल्य योगदान दिलेले आहे. स्त्री शिक्षण, बहुजन शिक्षण तसेच ज्ञाननिर्मिती या करीता महत्वाचे कार्य केलेले आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री शिंदे यांनी केले.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्मदिवस, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपुर या संस्थेमार्फत संपुर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्व जिल्हयात अभिनव पध्दतीने साजरी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या निर्देशानुसार येत आहे असे ते म्हणाले. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सायंकाळी यशंवतराव चव्हाण नाटयगृह येथे प्रो. डॉ. संजय मोहोड यांचा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांचे जिवन कार्यावर आधारीत गीतांचा ( स्वर फुलोरा ) संगीतरजनी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS