राज्यात बंपर महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरती होणार आहे. राज्यातील तरुण तरु

राज्यात बंपर महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरती होणार आहे. राज्यातील तरुण तरुणींना यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता या पद भरतीमध्ये कोणताही लिंगभेद नं मानता तृतीयपंथीयांनाही संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना नेहमीच कोणत्याही नोकरी किंवा आरक्षणात डावलल्या जातं अशी तक्रार नेहमीच असते. त्यात कोणत्याही नोकरीमध्ये सामावून घेण्यास त्यांना दुजा भाव दिला जातो. मात्र सरकारी नोकरीमध्ये तरी आपल्याला संधी देण्यात यावी अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच राज्याच्या पोलीस भरतीमध्ये कुठलाही लिंगभेद नं मानता सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच त्यांची मणी मान्य करण्यात आली नाही तर न्यायलयात धाव घेऊ असा ईशारा तृतीयपंथीयांकडून देण्यात आला आहे.
COMMENTS