Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेचा तिसरा उमेदवारही जाहीर

मुंबई ः मनसेने विधानसभा निवडणुकीनिमित्त रणशिंग फुंकले असून, 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नाही

मुंबई ः मनसेने विधानसभा निवडणुकीनिमित्त रणशिंग फुंकले असून, 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी सोलापूर दौर्‍यावर असताना सोलापूर आणि शिवडी येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली होती. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा दौर्‍यात देखील त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात संतोष नागरगोजे हे निवडणुकीला सामोरे जातील हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

COMMENTS