Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाइल हिसकावणारे चोरटे अटकेत

पुणे : रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून मोबाइल संच हिसकावणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन दुचाकींसह 11 मोबाइल संच जप्त क

Solapur: युट्यूबवर प्रशिक्षण घेऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा अटकेत | LOKNews24
कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा : राजेश टोपे
निपमची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पुणे : रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून मोबाइल संच हिसकावणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन दुचाकींसह 11 मोबाइल संच जप्त करण्यात आले. रईस जाकीर शेख (वय 21, रा. बोपोडी), रोहित रणवीरसिंग चिडार (वय 21, रा.जयजवान नगर येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी शेख, चिडार आणि अल्पवयीन साथीदारांनी रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून त्यांचे मोबाइल संच हिसकावले होते. आरोपी कल्याणीनगर भागात थांबल्याची माहिती पोलीस नाईक अमजद शेख आणि अनिल शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी येरवड्यातील आगाखान पूल परिसर, वडगाव शेरी, अप्पा बळवंत चौकात मोबाइल संच हिसकावल्याची कबुली दिली आहे.पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक जयदीप गायकवाड, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, गणपत थिकोळे, तुषार खराडे, अमजद शेख, किरण घुटे, कैलास डुकरे आदींनी ही कारवाई केली.

COMMENTS