चोरट्यांनी घरफोडी करून 13 ते 15 तोळे केले लंपास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरट्यांनी घरफोडी करून 13 ते 15 तोळे केले लंपास

पनवेल तालुक्यातील बारापाडा गावातील घटना

पनवेल प्रतिनिधी  - पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात एका घरात घुसून 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केली आह

विद्यार्थ्यांनी वाचली चार लाख पुस्तके
आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी
व्यसनी उंदरांनी फस्त केलं 581 किलो चरस

पनवेल प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात एका घरात घुसून 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केली आहे. रात्री तीन च्या सुमारास अज्ञात चोर घरावर चढून घराची कौले काढून आत प्रवेश केला असून स्वयंपाक घरातील कपाट फोडून त्यात असणारे 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लुटली असल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर(Ravindra Daundkar) आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला तात्काळ भेट देऊन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS