Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोरट्यांचा उच्छाद

रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने केले लंपास

पुणे ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली विविध शहरातून शांतता रॅली काढण्यात येत आहे. पुण्यात देखील रविवारी शांतता फेरी काढण्यात

हार्दिक-अक्षयाची थाटामाटात साजरी झाली पहिली मंगळागौर
भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू | LOKNews24*
ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला – अतुल लोढें  

पुणे ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली विविध शहरातून शांतता रॅली काढण्यात येत आहे. पुण्यात देखील रविवारी शांतता फेरी काढण्यात आली. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत 9 लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरी करून नेल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी विश्रामबाग, स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी पुणे शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी, रोकड, तसेच मोबाइल चोरून नेले. बाजीराव रस्त्यावरील फुटक्या बुरूजाजवळ एका तरुणाच्या गळ्यातील 92 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत प्रणय लक्ष्मण पळसकर (वय 32, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात फिर्याद दिली. पळसकर बाजीराव रस्त्यावरील कडबे आळी परिसरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी पळसकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. पोलिस हवालदार एस सुरवसे पुढील तपास करत आहेत. सारसबाग परिसरात दोघांच्या गळ्यातील 85 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत प्रकाश सुरेश सूर्यवंशी (वय 42, रा. सुश्रृत रेसीडन्सी, गजानन मंदिराजवळ, नर्‍हे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी आणि त्यांचे परिचित दत्ता तुपे सारसबाग परिसरात थांबले होते. त्यावेळी चोरट्याने दोघांच्या गळ्यातील अलगद सोनसाखळी चोरून नेली. स्वारगेट भागातील देशभक्त केशवराव जेधे चौकात चोरट्यांनी एकाच्या खिशातील 57 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत बाळासाहेब ज्ञानेश्‍वर पिलावरे (वय 54, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेधे चौकात एकाच्या गळ्यातील 3 लाख 30 हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सत्यवान लक्ष्मण जगताप (वय 51, रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी स्वारगेट पोलिसठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप, त्यांचे परिचित जालिंदर सुरवसे, सुरेंद्र कदम रविवारी दुपारी शांतता फेरीत सहभागी होण्यासाठी निघाले होते. जेधे चौकात गर्दी होती. चोरट्याने जगताप यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. जेधे चौकात दीपक बापू बांदल (वय 37, रा. वडाची वाडी, ता. हवेली ) यांच्या गळ्यातील 3 लाख 30 हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. पोलिस उपनिरीक्षक एन राठोड पुढील तपास करत आहेत.

COMMENTS