Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांजा गोळा करून करीत आहेत पर्यावरणाचे रक्षन….

नंदुरबार प्रतिनिधी - पतंगोत्सवात तुटून पडलेले दोरे अर्थात मांजामुळे कुणाला ईजा होऊ नये, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी नंदुरबारातील चिराग गल

महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 
माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

नंदुरबार प्रतिनिधी – पतंगोत्सवात तुटून पडलेले दोरे अर्थात मांजामुळे कुणाला ईजा होऊ नये, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी नंदुरबारातील चिराग गली मोहल्ला भागातील युसूफखान महमंदखान हे स्वत : हून मांजा गोळा करतात. रस्त्यावर पडलेले, झाडावर, वीज खांबवर अडकलेला मांजा गोळा करून ते विल्हेवाट लावतात. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरु आहे.  मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा रस्त्यावर पडून असतो त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे ,वाहन चालवणारे तसेच पशुपक्षी यांना या मांज्यामुळे मोठ्या प्रमाणात ईजा होते व जायबंदी व्हावे लागते. त्यामुळे आपले सामाजिक कार्य लक्षात घेता युसूफभाई खान हे गेल्या दहा वर्षापासून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर झाडावर व इतरत्र पडलेले मांजा गोळा करून पोलीस स्टेशनला जमा करतात किंवा इतरत्र जाळून त्याची विल्हेवाट लावतात. दर वर्षी वीस ते पंचवीस किलो मांजा संपूर्ण शहरात फिरून  गोळा करण्याचे काम ते करत असतात. नायलॉन मांजामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणालाही हानी होत आहे म्हणून प्रशासनाने या मांज्यावर बंदी आणावी अशी मागणी युसुफ खान मोहम्मद खान यांनी  केली आहे.

COMMENTS