तर  नवाब मलिकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही – आशिष शेलार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तर नवाब मलिकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही – आशिष शेलार

मुंबई : नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या

महाराष्ट्राची झेप…
एकच घर अनेक पक्ष !
मामा-भाचे टोळीला मोक्का ; दोन खुनी हल्ले; कॅश लुटणारी नऊ जणांची टोळी

मुंबई : नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय? माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीनेही फोटोचं राजकारण बंद करावे.

COMMENTS