Homeताज्या बातम्यादेश

देशात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला थारा नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन आता बदलत आहे. पूर्वी जग जीडीपी केंद्रीत होते. आता ते मानवकेंद्रीत होत आहे, यामध्ये भारता

मोदी मित्रांच्या खिश्यात देश घालायला निघालेत
आवास योजनेमुळे गरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती
मोदींना हिरोची उपमा… ‘या’ क्रिकेटरने केले कौतुक…

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन आता बदलत आहे. पूर्वी जग जीडीपी केंद्रीत होते. आता ते मानवकेंद्रीत होत आहे, यामध्ये भारताची मोठी भूमिका आहे. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास हेच जगासाठी मार्गदर्शक तत्व ठरू शकते. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, मात्र यासोबत देशामध्ये भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिक वाद यांना आपल्या राष्ट्रीय जीवनात स्थान नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ’जी- 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळणे, ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. भारताला मिळालेल्या अध्यपदाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ’सबका साथ, सबका विकास’ हे जागतिक कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते.’ असे पीएम नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारताच्या ’जी-20 अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत आणि यापैकी काही ’माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत’. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन आता मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. यामध्ये भारत उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहे. सबका साथ, सबका विकास हे जागतिक कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ’दीर्घकाळ भारताकडे एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिले जात होते. आता तो एक अब्ज महत्त्वाकांक्षी मन आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश आहे. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन होता. आता तो मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. यामध्ये भारत उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहे.’ यावेळी पीएम मोदींनी चीन आणि पाकिस्तानचा देखील समाचार घेतला आहे. काश्मीर, अरुणाचलमध्ये जी-20 परीषद बैठकीवर पाकिस्तान, चीनचा आक्षेप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावला. देशाच्या प्रत्येक भागात सभा आयोजित करणे स्वाभाविक आहे, असे म्हणत त्यांनी चीन आणि पाकिस्तानला टोला लगावला. सबका साथ, सबका विकास हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते.’ असे म्हणत ’भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल. भारतातील भ्रष्टाचार, जातिवादाला स्थान नसेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, ’आज भारतीयांना विकासाचा पाया रचण्याची मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षे स्मरणात राहील. असे पीएण मोदी यांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्धावर पीएम मोदींनी सांगितले की, ’विविध ठिकाणी विविध संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग संवाद आणि मुत्सद्दीपणा आहे. त्याचसोबत, ’सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी जगाचे सहकार्य आवश्यक आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

COMMENTS