Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीव्हीपॅटमधील मोजणीत तफावत नाही : निवडणूक आयोगाचा खुलासा

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीनंतर महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका घेण्या

राज्यात आरक्षण प्रश्‍नांवर स्फोटक परिस्थिती
बंगळूर स्थानकावर उद्यान एक्सप्रेसला आग
केंद्र सरकार लवकरच स्मार्ट सिटी योजना गुंडाळणार – मोहन जोशी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीनंतर महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका घेण्यात येत आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या आहेत. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आवाहन केले होते, मात्र व्हीव्हीपॅटमधील मतमोजणीत कुठेही तफावत नसल्याचा महत्वपूर्ण खुलासा मंगळवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या खुलाशात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, व्हीव्हीपॅट मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे, ईव्हीएमच्या आरोपात कसलेली तथ्य नसल्याचे आयोगाने सांगितले आहे. एकीकडे मारकडवाडी गावात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून येते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मतदानादिनी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत वाढलेल्या मतदानावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. या चर्चा आणि गोंधळदरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील ततझ-ढ मशिनबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ-विधानसभा विभागातून 5 मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅटची स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार, येथील व्हीव्हीपॅट मशिनची मोजणी करण्यात आली आहे.23 नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट स्लिम मोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी निरीक्षक-उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 व्हीव्हीपॅट युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिपचा काउंट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी समसमान आहे. त्यामध्ये, कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे, मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मारकडवाडी गावाला भेट देऊन महायुतीचे नेते व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवणार्‍यांनाविरुद्ध आज महायुतीच्या नेत्यांनीही मारकवाडीत गावात भेट देऊन आंदोलन सुरु केले आहे.

COMMENTS