मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये दोन्ही गटांकडून युक्तीव
मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सोमवारी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये दोन्ही गटांकडून युक्तीवाद करण्यात आला असला तरी, या याचिकेचा फैसला लवकर येण्याची शक्यता नाही. कारण एकूण 34 याचिकांवर सुनावणी आणि साक्षीपुरावे तपासण्यासाठी बराच वेळ लागणार असल्यामुळे यंदातरी अपात्रतेवर फैसला होणे अवघड दिसून येत आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
एकूण 34 याचिकांची ही सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत आहेत. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीनंतर नार्वेकर यांच्यावर दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही या संदर्भात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे याजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या सुनावणीदरम्यान, सर्व 34 याचिका एकत्र करा, आमची मागणी मान्य का करत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे. शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्र नको, वेगवेगळी सुनावणी घ्या, असा युक्तिवाद यावेळी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सगळ्या याचिका एकत्रित चालवाव्या या शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीवर अॅड देवदत्त कामत, असिम सरोदे, रोहित शर्मा यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर एकनाथ शिंदे गटातर्फे अॅड. अनिलसिंग यांनी याचा प्रचंड विरोध केला. प्रत्येक याचिका स्वतंत्र चालवावी आणि आम्हाला आवश्यक वाटेल तर नैसर्गिक न्याय तत्वानुसार पुरावा घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली.
सुनावणीचे वेळापत्रक देणार- एकूण 34 याचिकांवर सुनावणी होणार असल्यामुळे ही सुनावणी जास्तकाळ चालणार आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सगळ्या वकिलांना सुचवणार आणि त्यावर सगळ्यांची मते घेणार आहेत. सर्व वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचे वेळापत्रक देण्यात येणार आहे. सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार, असे अध्यक्षांनी म्हणताच ठाकरे गटातर्फे यावर आक्षेप घेण्यात आला. असे आधी कधीच झाले नाही, असे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी म्हटले आहे.
यावर्षी निकाल लागणे अशक्य-विधानसभा अध्यक्षांकडून ज्याप्रकारे आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे, आणि यासंदर्भात एकूण 34 याचिका असल्यमुळे यावर सुनावणी घेण्यास लागणारा वेळ, साक्षीदार तपासण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेता, यंदा निकाल लागणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या 22 तर शिंदे गटाच्या 12 अशा एकूण 34 याचिका आहेत. सर्व याचिकांवर स्वतंत्र युक्तिवाद होणार आहे. संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे व उलट तपासणी यांचा समावेश आहे. संबंधित प्रकियेला किमान 3 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी असल्याने सुनावणीची शक्यता कमी आहे
COMMENTS