नवी दिल्ली : हरियाणाचा गड राखण्यासाठी सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच भाजपसाठी हरियाणाचे मोठे आव्हान उभे असतांनाच दुसरीकडे आम आदम

नवी दिल्ली : हरियाणाचा गड राखण्यासाठी सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच भाजपसाठी हरियाणाचे मोठे आव्हान उभे असतांनाच दुसरीकडे आम आदमी पक्ष अर्थात आप आणि काँगे्रस आघाडी करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 20 उमेदवारांची नावे आहेत. आपने काँगे्रससोबत कोणतीही आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील 90 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. आघाडीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या. ’आप’ने 10 जागा मागितल्या होत्या, पण काँग्रेसने 4+1 जागांची ऑफर दिली होत्या. ज्यावर एकमत झाले नाही. राज्यातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
COMMENTS