Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्लक्षित घटकांचा सन्मान करण्यात वेगळाच आनंद ः माजी खा. तनपुरे

राजेश पवार, प्रकाश नगरकर, कृष्णा पोपळघट, बाळासाहेब लगे यांचा गौरव

राहुरी ः समाजातील दुर्लक्षित घटक या कायम चांगले काम करूनही समाजापासून दूर असतो या या दुर्लक्षित घटकांचा आज माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सन्मान

अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
देवरेंविरोधात आंदोलनाचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा
 श्रीरामपूर मध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक

राहुरी ः समाजातील दुर्लक्षित घटक या कायम चांगले काम करूनही समाजापासून दूर असतो या या दुर्लक्षित घटकांचा आज माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सन्मान केला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी एका समारंभ त्यांच्या फार्म हाऊस वर आयोजित केला होता त्या कार्यक्रमात शहरातील विविध घटकातील उत्कृष्ट कार्य करणारे व जे कायम या गोष्टी पासून लांब असतात अश्या 4 व्यक्तींचा सन्मान माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केला.त्यात 105 वेळा रक्तदान करणारे प्रकाश मुरलीधर नगरकर, सण वार न पाहता 365 दिवस जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छता दूत पालिकेचे आरोग्याधिकारी राजेंद्र लक्ष्मण पवार, सर्प मित्र कृष्णा पोपळघट, व वाद्य संगीतात अल्पवधीत नांव लौकिक मिळविलेले बाळासाहेब लगे यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार केला.
शहरातील नागरिकांचे आरोग्य आबादित राहावे यासाठी बारा महिने चोवीस तास समाजाची सेवा करणारे मग ते सण वार उत्सव असो दिवस रात्र स्वच्छतेचे काम करतात अश्या स्वच्छता दूत यांचा त्यांचे प्रतिनिधी म्हणून पालिकेचे 1) आरोग्याधिकारी राजेश पवार, विविध आजारात प्रत्येकाला रक्ताची गरज असते त्यासाठी सर्वत्र रक्त पेढ्या रक्त गोळा करण्याचे काम करताना विविध ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करतात त्या प्रत्येक शिबिरात वयाची सत्तरी पूर्ण केलेल्या शहरातील स्वातंत्र्य सैनिक भारत भैय्या नगरकर यांचे सुपुत्र 2) प्रकाश मुरलीधर नगरकर यांनी आता पर्यंत 105 वेळा रक्तदान करून समाजापुढे व युवका पुढे आदर्श निर्माण केला म्हणून त्यांचा सन्मान, हिवाळा अस पावसाळा असो की उन्हाळा असो दिवस रात्री कधी सर्प दर्शन होत असते मग त्यावेळी सर्प पाहिल्यावर प्रत्येकाला भीती वाटत असते मग ते सर्पाला मारण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतात मग आठवण येते समाजात चोवीस तास काम करणार्‍या सर्पमित्रांची अश्या कोणाचाही कधीही फोन येऊ दे त्यासाठी तत्परतेने धावून जाणारे 3) सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांचाही सन्मान, तसेच आज कुठलाही कार्यक्रम असो वाद्य संगीता शिवाय पर्याय नाही ते अनेक वर्षा पासून सदर सुविधा उपलब्ध करून देत सर्व प्रकारची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे 4) बाळासाहेब लगे या सर्वाचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रेरणा ग्रुपचे संस्थापक व ऑल इंडिया मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,कारखान्याचे माजी संचालक एस एम पाटील, बाळासाहेब गाडे पंढरीनाथ पवार ताराचंद तनपुरे व युवा नेते सोहम प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.त्याच बरोबर शहरात स्वच्छता दूत म्हणून काम करणार्‍या 200 महिलांना गोड स्नेह भोजन दिले.तसेच शहरातील गरीब अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या मिशन शाळेतील अनाथ गोरगरीब विद्यार्थ्यांना पाची पोशाख, स्नेह भोजन व महिना भर पुरेल एवढा शिधा मिशन शाळेतील अनाथ आश्रम शाळेस दिला.

COMMENTS