Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड शहरातील फरांदे नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नांदेड ।  प्रतिनिधी नांदेड शहरातील फरांदे नगर परिसरात चोरट्यांनी बंद घराला लक्ष

प्रभाग सहामध्ये शीला भवरे यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात नांदेडमध्ये भाजपकडून जाहीर निषेध
महापालिकेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड ।  प्रतिनिधी
नांदेड शहरातील फरांदे नगर परिसरात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराचे मुख्य कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरांदे नगर येथील रहिवासी जीवन शेवाळकर (वय 69 वर्षे) हे 2 फेब्रुवारी रोजी सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत त्यांचे घर बंदच होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी कपाटांची उचकापाचक केली. त्यातून 1 लाख 43 हजार रुपयांच्या किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचेही आढळून आले आहे. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शेवाळकर घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करताच सर्वत्र पसारा आणि कपाटे उघडी असल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ नांदेड पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बंद घरे, वृद्ध नागरिकांची निवासस्थाने आणि भरवस्तीतील गल्लीबोळ यांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनेनंतर फरांदे नगर परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भर वस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS