Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हिल हडको येथील घरफोडीत दागिन्यांची चोरी

अहमदनगर :  बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे ल

पाथर्डी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर
कर्जत पोलीस ठाण्यात मुलींची ‘सहल’
पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?

अहमदनगर :  बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना नगर मनमाड रोडवरील सिव्हिल हडको येथील गणेश चौकातील तुळजाभवानी मंदिरा शेजारी घडली.  याबाबतची माहिती अशी की सुनिता हरी नागरगोजे व 29 या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नोकरीस आहे. त्यांनी गणेश चौक येथे खोली भाडेतत्वावर घेताना त्यांचे घरगुती वापरातील सामान घेऊन तिचे राहावयास गेल्या त्यावेळी त्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकर मध्ये एका डब्यात त्यांचे व त्यांच्या मुलीचे सोन्याचे दागिने ठेवले होते त्यानंतर दिनांक सात जून रोजी रात्री कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेली दागिने पाहिले असता त्याचे ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांना दिसले नाही त्यावर त्यांनी सर्व घरांमध्ये पाहणी केली परंतु सोन्याचे दागिने कोठेही मिळून आले नाही यावरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या कपाटातून चोरट्याने अर्धा अर्धा तोळे वजनाच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चैन चोरीस गेल्या. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सुनीता नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 457 380 घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली .

COMMENTS