निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील बहुचर्चित निळवंडे उजव्या कालव्यावर करण्यात येणार्‍या पुलाचे गज (स्टिल) लेबर ठेकेदारानेच दोघांना विकल्याचे स्पष्ट

परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे
महादजी शिंदे इंग्लिश स्कूलचा दहावीचा 100 टक्के निकाल
कर्ज रकमेचा गैरवापर, त्या जमिनीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील बहुचर्चित निळवंडे उजव्या कालव्यावर करण्यात येणार्‍या पुलाचे गज (स्टिल) लेबर ठेकेदारानेच दोघांना विकल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विष्णू गोपाळराव पालनकर (रा. परभणी, हल्ली रा. धांदरफळ, ता. संगमनेर), गणेश सावळेराम खताळ व बाळासाहेब सावळेराम खताळ (दोन्ही रा. धांदरफळ, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व 400 किलो स्टील पोलिसांनी जप्त केले. संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर रोडवर निळवंडे उजव्या कालव्याच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी आणण्यात आलेले लोखंडी गज (स्टील) हे लेबर ठेकेदाराने दोघाजणांना चोरुन विकले. या कामासाठी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर स्टील आणले. मात्र या स्टीलमधील 12 एम.एम जाडीच्या 24 हजार रुपये किमतीच्या 400 किलो स्टीलची चोरी लेबर ठेकेदार विष्णू पालनकर याने केली व ते धांदरफळ गावातील गणेश व बाळासाहेब खताळ यांना विकले. हे स्टील यांच्या घराच्या पोर्चमध्ये मिळाले. याबाबत ठेकेदार सतीश येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

COMMENTS