Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकल समितीच्या कामाचा महिला आयोगाने केला गौरव

अकोले प्रतिनिधी ः कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कामाबद्दल कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर

निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको
भूतबाधा काढण्यासाठी घेतले आठ हजार रुपये; नगरच्या वैदूवाडीत अंधश्रद्धेचा प्रकार
छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा

अकोले प्रतिनिधी ः कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कामाबद्दल कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांना मुंबईत राज्य महिला आयोगाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहावर बंदरविकास मंत्री दादा भुसे व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 कोरोनानंतर एकट्या पडलेल्या महिलांसाठी आधार देण्यासाठी केलेले हे काम महत्वाचे आहे असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. राज्यातील 81 तालुक्यातील 4000 कोरोना विधवांचे प्रश्‍न सोडवणे व पुनर्वसन करणे असे काम कोरोना एकल समितीचे काम राज्यात करत आहेत. दीड कोटी रुपयांची मदत महिलांसाठी जमा करून शिलाई मशीन, शेळीपालनासाठी शेळ्या घेऊन दिल्या.व्यवसाय उभे करून दिले. 15 विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना व बालसंगोपन योजनेचा शेकडो महिलांना लाभ मिळवून देण्यात आला. या कामाची नोंद घेऊन महिला आयोगाने हा विशेष सन्मान केला. काल मुंबईत राज्य महिला आयोगाच्या वर्धापनदिनानिमित्त कोरोना एकल महिलांसाठी केलेल्या कामाबद्दल  सह्याद्री अतिथीगृहावर बंदरविकास मंत्री दादा भुसे व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

COMMENTS