नांदेड प्रतिनिधी- नांदेड मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेवर भयंकर प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना एका महिलेला वान
नांदेड प्रतिनिधी– नांदेड मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेवर भयंकर प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना एका महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिलं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये ही घटना घडली. विहिरीत पडलेल्या या महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. विहिरीच्या शेजारी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि विहिरीत पडलेल्या या महिेलला बाहेर काढलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेला गावातील लोकांनी वनविभागाला जबाबदार धरलंय.

COMMENTS