रंगभूमीचा खरा इतिहास

Homeताज्या बातम्यासंपादकीय

रंगभूमीचा खरा इतिहास

३० एप्रिल १८७० साली भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे

सर्वसामान्यांचा विसर
राजकारणातील अपरिहार्यता
व्यवस्थेला लागलेली कीड

३० एप्रिल १८७० साली भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे झाला. फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती. त्यामुळे त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. मात्र त्यापूर्वी मराठी रंगभूमीमध्ये नाटकांचा दबदबा होता. मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही लोकांनी खोडसाळपणा केला आहे. त्याचे सत्य काय आहे याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.
मराठी नाटकाबरोबर रंगभूमीची सुरुवात विष्णूदास भावे यांचे ‘सिता स्वयंवर’(1843)  हे पहिले नाटक सादर झाल्यानंतर त्यांनी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचे स्मरण म्हणून प्रतिवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. वास्तविक भावे यांनी त्या वर्षी या नाटकाचा प्रयोग कधी केला? त्याचा पुरावा नाट्यसंशोधकांना सापडला का? रंगभूमीच्या इतिहासात चुकीचे उल्लेख करण्यात आले आहेत. याचा अन्वयार्थ लावणे क्रमप्राप्त.1843 पूर्वी मराठी रंगभूमी संघटीत स्वरुपात नसली तरी कळसुत्री बाहुल्यांचे खेळ, सोंगी भजन, नाटक , दशावतार, तमाशा, गोंधळ, बोहाडा, वासुदेव, कीर्तन, तुंबडी, कवणे, भारुडे आदी लोककला प्रकार रुढ होते त्याचे पुरावे आढळतात. हे कला प्रकार लोकरंगभूमीचेच रुपे आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास आदींच्या साहित्यकृतीतून या लोककलेचे आणि रंगभूमीचे उल्लेख आढळतात. इ.स.पूर्व. 5 व्या शतकात ग्रीक रंगभूमीवर झालेल्या नाटकापासून ते आजपर्यंत जगभरात नाटक सादर होत आहेत. म्हणजे जवळपास अडीच हजार वर्षांहून अधिक काळ नाटक नावाची गोष्ट आपल्यावर प्रभाव गाजवत आहे. ही प्रभावी नाटके अनेक कालखंडातून गेली आणि तिने अनेक स्थित्यंतर पाहिली. या प्रवासात नाटकाची मरणावस्था, बहारअवस्था, नाट्य इतिहासाने अनुभवली. महापरिनिर्वाण सुक्त, या बुद्धग्रंथात आणि मराठी ज्ञानकोषातील संदर्भानुसार संस्कृत भाषेतील नाटकांमध्ये सर्वात प्राचीन नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्यांची नाटके बौद्धधर्मातील शिकवणी संदर्भातील होती. 1912 मध्ये केरळात ताडपत्र्यांवर लिहिलेली भास या नाटककाराची 13 नाटके सापडलेली आहेत. भास आणि कालीदास हे प्राचीन भारतातील नाटककार होते. त्यांची नाटके बहुदा संस्कृत भाषेत असली तरी त्यातील काही पात्रे प्राकृतिक भाषेत बोलत असत. यामुळे 1843 पुर्वी मराठी रंगभूमीवर नाटके आणि इतर सांस्कृतिक कलेली परंपरा प्रबोधन आणि मनोरंजनासाठी होती हे ऐतिहासिक सत्य लक्षात येते. आज मराठी रंगभूमी दिन आहे. या निमित्ताने विष्णुदास भावे यांच्या नाट्यसंस्कृतीचा गौरव करणे आणि त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. या निमित्ताने मराठी रंगभूमीवर काम करणार्‍यांचाही गौरव करुन महाराष्ट्राची लोककला आणि मराठी रंगभूमीचा वेध घेणे आहे असत्य इतिहासाचे प्रभंजन करणे यासाठी हा लेखन प्रपंच क्रमप्राप्त.
 भारतातील काही पहिल्या परिवर्तनवादी सुधारकी नाटकापैकी ‘तृतीयरत्न’ हे महात्मा फुले यांचे नाटक आले ते 1855 साली. म्हणजे 1857 च्या बंडाच्या दोन वर्ष आधी या नाटकाच्या निर्मितीच्या मागे अनेक सामाजिक-राजकीय कारणे होती. दरम्यानच्या कालखंडात सामाजिक-राजकीय घटनेचंं, विचाराचं, प्रतिबिंब नाटकातून उमटलं. राजकीय आणि सामाजिक नाटकांची मोठी परंपरा मराठी रंगभूमीला सुरुवातीलपासून मिळाली. 1880 नंतर संगीत रंगभूमीद्वारे मराठी रंगभूमीने कलात्मक दृष्टीतही मोठी झेप घेतली. प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि पददलितांच्या रंगभूमीचे दोन प्रवाह त्याच काळात निर्माण झाले आणि मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने आधुनिकतेच्या प्रवाहात समाजकारणात आणि राजकारणात भ्रष्ट व्यवहाराचे आणि मध्यमवर्गाने सुलभीकरण केलेल्या भांडवलदारांच्या हातात ही रंगभूमी दंगवली. खर्‍या अर्थाने ही परंपरा अद्याप सुरु असली तरी एकीकडे प्रचंड नवचैतन्य जर दूसरीकडे प्रचंड निराशावाद अशा दोन्ही प्रक्रियेतून मराठी रंगभूमी वाटचाल करु लागली. दुदैर्वाने अत्यंत समृद्ध परंपरा असलेल्या या रंगभूमीवर अपवाद वगळता उच्चवर्णिंयांचेच वर्चस्व राहिले. त्यामुळे समाजाला आवश्यक तत्व वैचारिक बैठक-एका तत्व विचाराला, सामाजिक सहानुभूती सामाजिक अर्थ लावणारी वैचारिक रंगभूमीची अनावस्था झाली. नंतरच्या काळात भांडवली रंगभूमीच्या मंचावरुन जाणीवपूर्वक सामाजिक व राजकीय तत्वप्रणालील छेद देवून मनोरंजन-व्यावसायिक-प्रायोगिक अशा नाटकांचा उदय होत गेला. प्रबोधनासाठी निर्माण झालेल्या या संस्कृतीला मोठा इतिहास लाभलेला आहे. या गौरवशाली इतिहासात एकपात्री नाटक, चित्रनाट्य, तमाशा ,दीर्घ नाट्य, नाटीका, नाट्यछटा, नृत्यनाटिका, पथनाट्य, बालनाट्य, बाहुली नाट्य, भक्ती नाट्य, भयनाट्य, महानाट्य, रिंगननाट्य, विनोदी नाटक, कवणे, गोंधळ, भारुड, भजन आदी नाट्यप्रकारातून प्रबोधन करण्याचा इतिहास आहे. मात्र भारतीय इतिहासात इतिहासाची तोडमोड करण्याचे अनेक दाखले आहेत. खोटा इतिहास लिहिणारी मनोवृत्ती भारत देशात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तीन-तीन तारखा असल्याचे आपण अनुभवतो. महाराष्ट्राचा रंगभूमीचा  खरा इतिहास प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. 

COMMENTS