Homeताज्या बातम्यादेश

संसदेत संवादाची परंपरा कायम रहावी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

पाटणा : संसद आणि विधिमंडळामध्ये अडथळामुक्त, पद्धतशीर चर्चा आणि उत्कृष्ट संवादाची परंपरा कायम राहिली पाहिजे असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

बावनकुळे आणि फडणवीस राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करत आहेत – महेश तपासे
राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू
कोतुळमधील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी

पाटणा : संसद आणि विधिमंडळामध्ये अडथळामुक्त, पद्धतशीर चर्चा आणि उत्कृष्ट संवादाची परंपरा कायम राहिली पाहिजे असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. बिहारच्या पाटणा येथे आयोजित 85 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात बिर्ला बोलत होते.
याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, संसद आणि विधिमंडळातील घटत्या चर्चा सत्रांच्या संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व पीठासीन अधिकार्‍यांचा हा प्रयत्न असायला हवा की सभागृहांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, सहमती आणि असहमती असली तरी आपली सभागृहे चांगल्या वातावरणात चालली पाहिजेत. सर्व पीठासीन अधिकार्‍यांनी संविधानाचा 75 वा वर्धापन दिन सण म्हणून साजरा करण्यासाठी रचनात्मक कल्पना दिल्या आहेत. यामध्ये भारताची संसद आणि सर्व राज्यांची विधानसभा-पंचायती राज संस्था, नागरी संस्था, सहकारी संस्था, युवक, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, प्रसारमाध्यमे आणि लोकशाहीचे सर्व भागधारक या सर्वांचा वर्षभर सहभाग असेल. देशाच्या कानाकोपर्‍यात आपली महान लोकशाही बळकट करण्यासाठी मोहीम राबवणार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS