Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम

कोपरगाव तालुका : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्र

24 वर्षांपासूनच्या थकीत बड्या 273 जणांवर पवारांची कृपा…भूविकास बँकेचे पावणे बारा कोटीचे कर्ज झाले माफ
सामाजिक शांतता भंग करणार्‍याविरुद्ध पोलिस स्वतःहून कारवाई करणार
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी, संस्कृती, सिद्धी, रिद्धी व संस्कार यांचा गौरव

कोपरगाव तालुका : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असून, परीक्षेत प्रथम क्रमांक कुमार आदित्य कोद्रे 94.30 टक्के, द्वितीय क्रमांक कुमार प्रितेश पवार 91.60 टक्के,तृतीय क्रमांक कुमार विनीत आढाव 89.60 टक्के मिळविला आहे.
शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला. एकूण 49 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे तर 20 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये वैदेही खैरे 88.40 टक्के, साक्षी गवळी 87.40 टक्के, प्रतिक बारगळ 87.20,सारा शेख 85.00 टक्के,प्रेम देवडे-85.00 टक्के,नमन शर्मा-84.10 टक्के या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा तसेच कृतीयुक्त शिक्षण, वेळेचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांकडून पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून सराव करून घेतल्याने शाळेची गुणवत्ता उंचावली आहे. त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, सचिव किरण भोईर, विश्‍वस्त राजेंद्र सालकर, कैलास जाधव,विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS