Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी कडेवळीत रंगणार कुस्तीचा थरार 

श्रीगोंदा :  मातीचा सुगंध, गादीची शिस्त आणि पैलवानांची छातीठोक लढत अशी कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा (२०२५–२६) शनिवारी टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने, तसेच श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघ व टाकळी कडेवळीत ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, शनिवारी स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात आली. या स्पर्धेत वरिष्ठ गटातील गादी व माती कुस्ती, तसेच विविध वजनगटांतील जिल्हा केसरी निवड चाचण्या पार पडणार आहेत. स्पर्धा स्थळाची पाहणीही यावेळी करण्यात आली.   या पाहणीवेळी महाराष्ट्र केसरी व श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अशोक शिर्के, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रा. डॉ. संतोष भुजबळ, राष्ट्रीय कबड्डीपटू वैभव सुपेकर, पैलवान राकेश नवले यांच्यासह तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.  या निवड चाचणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० ते २५० कुस्तीगीर विविध वजनगटांत आपले कौशल्य आजमावणार आहेत. विजेत्या पैलवानांना पदक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, हेच विजेते पुढे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. म्हणजेच येथूनच पैलवानांना राज्यपातळीवरील वाटचालीचा मार्ग खुला होणार आहे. ‘’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

लेखी आश्वासनानंतर कोरेगव्हाणकरांचे उपोषण स्थगित
श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात प्रबोधन संवाद मेळावा उत्साहात
सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सवात प्रेक्षकांना मारहाण 

श्रीगोंदा :  मातीचा सुगंध, गादीची शिस्त आणि पैलवानांची छातीठोक लढत अशी कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा (२०२५–२६) शनिवारी टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने, तसेच श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघ व टाकळी कडेवळीत ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, शनिवारी स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात आली. या स्पर्धेत वरिष्ठ गटातील गादी व माती कुस्ती, तसेच विविध वजनगटांतील जिल्हा केसरी निवड चाचण्या पार पडणार आहेत. स्पर्धा स्थळाची पाहणीही यावेळी करण्यात आली.

  या पाहणीवेळी महाराष्ट्र केसरी व श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अशोक शिर्के, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रा. डॉ. संतोष भुजबळ, राष्ट्रीय कबड्डीपटू वैभव सुपेकर, पैलवान राकेश नवले यांच्यासह तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 या निवड चाचणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० ते २५० कुस्तीगीर विविध वजनगटांत आपले कौशल्य आजमावणार आहेत. विजेत्या पैलवानांना पदक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, हेच विजेते पुढे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. म्हणजेच येथूनच पैलवानांना राज्यपातळीवरील वाटचालीचा मार्ग खुला होणार आहे.

‘’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

COMMENTS