तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कारभार सिल्वर ओक, मातोश्री आणि सामना कार्यालयातून सुरू होता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कारभार सिल्वर ओक, मातोश्री आणि सामना कार्यालयातून सुरू होता

भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी

  बीड प्रतिनिधी - महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते. असा गौप्यस्फोट उपमु

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
शेतकर्‍यांनो खचून जाऊ नका..सरकार नुकसानीची मदत देईल !
इस्रो आज करणार चांद्रयान-3 प्रक्षेपण

  बीड प्रतिनिधी – महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते. असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी यावर प्रतिक्रिया दित महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे . तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कारभार सिल्वर ओक, मातोश्री आणि सामना कार्यालयातून चालत होता. असा आरोप कुलकर्णी यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न झाला आणि असंच कारस्थान हे फडणवीस यांच्या बाबतीत देखील झाले. परंतु आज वळसे पाटील खरं बोलत नसल्याचं कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

COMMENTS