Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

मतदानाचा टक्का वाढवण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन

मुबंई : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मत

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत
माणुसकी आणि कार्यावर ठरते श्रीमंती – पारस महाराज मुथा

मुबंई : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोकक्लिगंम यांनी यावेळी दिली. राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 97 लाख 40 हजार 302 इतकी असून महिला मतदारांची संख्या 4 कोटी 66 लाख 23 हजार 77 इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या 6 हजार 31 इतकी आहे. आतापर्यंत एकूण 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला असे प्रमाण आहे. सन 2019 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाझ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्याच्या मतदार यादीत 18-19 वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील जेष्ठ नागरिकांपैकी 47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.

COMMENTS