Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे यश हेच गावाचे यश – शिवाजी कराड

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथे 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक

सुपे परिसरातील अतिक्रमण जैसे थे
नगरमधील सात पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त
कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे…;तहसीलदार देवरेंची ऑडिओ क्लिप राज्यभरात चर्चेत, हुंदके देत केलेल्या निवेदनाने समाजमन अस्वस्थ

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथे 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली आणि विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा यथोचित सत्कार केला.         

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब याप्रसंगी बोलत होते की, गावाने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या अडचणी ओळखून सहकार्य करावे,म्हणजे विद्यार्थ्यांना यश नक्कीच मिळते. नेवासा बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. रासकर साहेब आणि केंद्रीय मुख्याध्यापक श्री. घुले सर यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अहमदनगर जिल्ह्यातील साधारणपणे 4000 शाळांच्या स्पर्धाकांमधुन मधून भालगाव शाळेचे विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून हे यश मिळवल्याबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी मिष्टान्न भोजन देण्यात आले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.

COMMENTS