लोणी ः प्रवरेची माती ही कसदार आहे यामुळेच भागातील विद्यार्थी हे साहित्य, कला, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मिळवत असलेले यश एव्हरेस्टच्या उंचीसारखे

लोणी ः प्रवरेची माती ही कसदार आहे यामुळेच भागातील विद्यार्थी हे साहित्य, कला, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मिळवत असलेले यश एव्हरेस्टच्या उंचीसारखे मोठे आहे.विद्यार्थ्यांच्या यशामागे दूरदृष्टी असलेले संस्थाचालक खंबीरपणे उभे असल्यानेच उद्दीष्ट्य साध्य होत असल्याचे प्रतिपादन 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुहाच्या वतीने पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 124 व्या जयंती निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणा-या विद्यार्थ्याच्या पारितोषिक वितरणांत डॉ. शोभणे बोलत होते. कार्यक्रमास, अरुणा शोभणे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, संचालक आप्पासाहेब दिघे, भाऊसाहेब जर्हाड, दादासाहेब घोगरे, रामभाऊ भुसाळ, गणपतराव शिंदे, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार आदींसह गुणवंत विद्यार्थी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. शोभणे म्हणाले, पद्मश्रींचे कार्य हे सर्व समावेशक असेच आहे. या मातीतून आदर्श आणि गुणवंत विद्यार्थी घडत आहेत. महानगरात जे शिक्षण मिळते तेच शिक्षण प्रवरेत मिळत आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वप्नपूर्तीसाठी येथील गुणीजण कायम सोबत आहेत.
प्रवरेची भूमी संस्कार देणारी आहे यामुळेच या मातीतून निर्माण होणारी माणस मोठी होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर प्रेम करा,कलागुणांना संधी देत पुढे चला आपल्या मध्ये काय आहे हे ओळखून मेहनत करून पुढे जा असा विद्यार्थ्यांना संदेश देतानांच पालकांनी आपली मते मुलांवर लादू नका त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात डॉ. प्रदीप दिघे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती घेत असताना संस्थेच्या माध्यमातून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक उपक्रम सुरू केले आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवरा स्पर्धा परीक्षेच विद्यार्थी शासकीय आणि पोलीस भरती आणि आर्मी मध्ये सहभागी झाले आहेत. पद्मश्रीमुळे आज हे सर्व उभे राहिल्याने ग्रामीण भागाचा विद्यिर्थी हा जागतिक पातळीवर पोहचला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी आणि डॉ.वैशाली मुरादे यांनी केले तर आभार डॉ. आर. ए. पवार यांनी मांडले.
COMMENTS