Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत ज्ञानेश्‍वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले वारीचे दर्शन

कोपरगाव शहर ः वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच डोलवत, टाळाच्या सुंदर तालात फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या

एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; डॉक्टरही चक्रावलेl पहा LokNews24
शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75
खासगी शाळांचे प्रश्‍न सोडवा

कोपरगाव शहर ः वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच डोलवत, टाळाच्या सुंदर तालात फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या सानिध्यात पावली, झांज खेळत संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचे दर्शन कोपरगावकराना घडवित पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्ष संवर्धन हि काळाची गरज, पाणी आडवा पाणी जिरवा असे अनेक जनजागृतीपर संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेवून जनजागृती केली.
 हरी आणि वारी हा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय असून आषाढी जवळ आली की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ती ओढ लागते पंढरपूरच्या वारीची,विठ्ठलाच्या दर्शनाची,लाखो वारकरी या पंढरपूरच्या वारीसाठी पायी पंढरपूरला जातात या आषाढी वारीची अनुभूती शालेय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संत ज्ञानेश्‍वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 16 जून 2024 रोजी संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पायी दिंडीची सुरुवात सप्तर्षीमळा शाखेतून करण्यात आली. कोपरगाव शहरातून बस स्टॅण्ड,विघ्नेश्‍वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झांज व विठ्ठलं रुक्मिणीच्या आकर्षक गाण्यांवर ठेका धरत उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या पायी दिंडीतील वारकर्‍यांनी शहरातून विठठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत पायी चालत ही दिंडी सराफ बाजार येथील हनुमान व विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आणण्यात आली. यावेळी वारकरी विद्यार्थ्यांनी भजन किर्तन करत हरिनामाचा जयघोष केला या दिंडीमध्ये छोट्या वारक्यांनी विठ्ठल रुखमाई, वारकर्‍यांची वेशभूषा करून हरिनामाचा जयजयकार करत फुगडी खेळत, टाळ वाजवत या वारीचा आनंद लुटला आहे. या प्रसंगी दिंडीचे मराठा पंच मंडळ ट्रस्ट कोपरगांवचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि श्रीमंत पवार सरकार चे सोमेश्‍वर महादेव देवस्थानचे वतीने दिंडीचे पुजन करून बालगोपाळांना खाऊ वाटप करत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मराठा पंच मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय भोकरे, विश्‍वस्त बाळासाहेब नरोडे, प्रकाश गवारे, मंदार आढाव, कारभारी नजन, रोहित वाघ, कैलास आढाव, साई नरोडे, श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्‍वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक नारायण अग्रवाल, जयंत विसपुते, श्री दत्तपार देवस्थानचे विश्‍वस्त हेमंत पटवर्धन. तसेच या दिंडीत विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्यासह पालकांनी देखील सहभाग नोंदवत पंढरपूरच्या वारीची अनुभूती घेतली. यावेळी संत ज्ञानेश्‍वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS