Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध

पारेगावच्या बाप कंपनीतील धक्कादायक प्रकार

संगमनेर प्रतिनिधी - संस्थेची माहिती विद्यापीठाकडे विचारल्याचा राग आल्याने तरुणाला प्राचार्यांच्या दालनात अडीच तास डांबून ठेवत दमबाजी करण्यात

Jalna : ३६ तासात दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश (Video)
पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जुळ्या मुली झाल्याने त्यांची हत्या करणार्‍या बापावर गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी – संस्थेची माहिती विद्यापीठाकडे विचारल्याचा राग आल्याने तरुणाला प्राचार्यांच्या दालनात अडीच तास डांबून ठेवत दमबाजी करण्यात आल्याने तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने विद्यार्थी बेशुद्ध पडला व त्याला पालकांच्या ताब्यात देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पारेगाव येथील बाप कंपनीच्या प्राध्यापकांसह काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनी संबंधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील बाप कंपनीमध्ये पाथर्डी तालुक्यातील हनुमान अण्णा गर्जे या बावीस वर्षे तरुणाने बीसीए साठीच्या प्रथम वर्षाकरिता डमिशन घेतले होते. डमिशन घेतेवेळी तेथील प्राध्यापकांनी मैसूर युनिव्हर्सिटीचे डिग्री प्रमाणपत्र आणि नोकरी लावण्याची हमी स्टॅम्प पेपरवर देण्याचे वचन दिले. त्यामुळे या विद्यार्थ्याने दिं 20 ऑगस्टला 60 हजार रुपये डमिशनसाठी भरले होते. नियमित कॉलेज केल्यानंतर दि. 3 नोव्हेंबरला त्याने प्राध्यापक रावसाहेब घुगे यांना शंभर रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर देत डमिशन घेतेवेळी दिलेली आश्‍वासने लेखी स्वरूपात मागितली होती. प्राध्यापक घुगे यांनी संबंधित स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवून घेतला वेळोवेळी मागणी करून देखील स्टॅम्प पेपर देण्यास नकार दिल्याने गर्जे याने बाप कंपनी पुणे व म्हैसूर विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आहे का अशी विचारणा मेलद्वारे विद्यापीठाकडे केली होती. त्यावर बाप कंपनी ही त्यांच्या अधिपत्याखाली नसल्याचे कळविण्यात आले होते. माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारल्याचा राग आल्याने गर्जे याला शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्राध्यापक रावसाहेब घुगे, उप प्राध्यापक दीपक नागरे यांनी त्यांच्या दालनात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी ऋतुजा पुरी, सुषमा आव्हाड व श्रीकांत दुबे यांनी या विद्यार्थ्याला तू ईमेल कोणाच्या सांगण्यावरून पाठविले तुला कोण सपोर्ट करतो अशी विचारणा केली. त्यावर या विद्यार्थ्याने तब्येत बरी नसल्याचे कारण देत नंतर तुमच्या प्रश्‍नांची माहिती देतो असे सांगितले. मात्र वरील चौघा आरोपींनी ’आज तू मेला तरी तुला जाऊ देणार नाही व तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करू’ अशी धमकी दिली. संबंधित विद्यार्थ्यांनी घरी जाऊ द्या अशी विनवणी करून देखील त्याला धमकी देण्याचा प्रकार साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. याशिवाय या सर्व प्रकारचे त्यांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग देखील केले त्यामुळे घाबरून हा विद्यार्थी तेथेच बेशुद्ध पडला. तत्पूर्वी घाबरलेल्या अवस्थेत हा विद्यार्थी असताना आरोपींनी त्याच्याकडून त्याचे बहिणीच्या पतीचा नंबर घेऊन त्यांना संस्थेत बोलावून घेतले. संबंधित विद्यार्थी रात्री नऊ वाजता शुद्धीवर आल्यानंतर तो रुग्णालयात असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने दाजी कडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी संस्थेत आल्यानंतर प्राध्यापक रावसाहेब घुगे एक पुरुष आणि दोन महिलांनी धमकी देत या विद्यार्थ्याला बराच वेळ त्यांच्या ताब्यात दिले नाही. बर्‍याच वेळानंतर बेशुद्ध अवस्थेतील विद्यार्थ्याला घेऊन त्याचे दाजी सुदाम गीते संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात आले होते. तेथून त्याला दुसर्‍या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयाने पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत रावसाहेब रामनाथ घुगे, श्रीकांत डूबे, सुषमा आव्हाड आणि ऋतुजा यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

COMMENTS