Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंधुदुर्गतील शिवरायांचा पुतळा कोसळला

शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

सिंधुदुर्ग ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनार्‍यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा

आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन
पावसाळ्यापूर्वी सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन करू- शिवसेना  जिल्हा संपर्कप्रमुख  शिवाजी सावंत 
शाहू महाराज छत्रपती लढणार लोकसभा ?

सिंधुदुर्ग ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनार्‍यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामांवर प्रश्‍न उपस्थित करण्यात येेत आहे.
हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात बोलतांना आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता. ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी  उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे. वादळी वार्‍यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून खाली कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे.

पुतळ्यासाठी केली होती 5 कोटींची तरतूद – छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते. पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. 

COMMENTS