Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनपरिक्षेत्रच्या कार्यालयाची अवस्था स्थलांतरित बिबट्यासारखीच ः नितीन शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी ः  कोपरगाव तालुका वन विभाग कार्यालयास स्वतःच्या मालकीची इमारत नसल्यामुळे हे कार्यालय अनेक भाडोत्री जागेवर एका ठिकाणावरून दुसर्‍

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार : महसूल मंत्री बावनकुळे
शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 
कोपरगावच्या हर्षा बनसोडेचा थायलंडमध्ये डंका

कोपरगाव प्रतिनिधी ः  कोपरगाव तालुका वन विभाग कार्यालयास स्वतःच्या मालकीची इमारत नसल्यामुळे हे कार्यालय अनेक भाडोत्री जागेवर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणावर स्थलांतरित होत आहे त्यामुळे कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय हे कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आसलेल्या तहसिल इमारतीत स्थलांतरित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिंदे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव येथील मध्यवर्ती इमारतीचे पहिल्या व दुसरा मजल्यांचं नियोजन हे मुळ आराखड्यात नसताना देखील तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कल्पनेतून तयार करण्यात येऊन वाढीव खर्चास शासकीय मंजुरी मिळवून दिली.तरी ही मध्यवर्ती शासकीय इमारत शासन का रिकामी ठेवत आहे असा सामान्य नागरिकांना प्रश्‍न निर्माण होण्यासारखाच आहे. पंचायत समितीची सर्व कार्यालये आपल्या स्वतःच्या नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर तहसील मध्यवर्ती कार्यालयाचा दुसरा मजला हा पूर्णपणे रिकामा झालेला आहे. तहसील मध्यवर्ती शासकीय इमारत हे नागरिकांच्या दळणवळण च्या सोयीची मुख्य इमारत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय हे महात्मा गांधी प्रदर्शन मधील छोटयाशा गळक्या खोल्या मधून कारभार करत होते परंतु गेल्या वर्षांपासून हे कार्यालय खंदक नाल्याजवळील महाजन बिल्डिंगमध्ये खाजगी तीन-चार रूम मध्ये भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे. ज्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील एखादा बिबट्या एका शेतातून दुसर्‍या शेतात तर कधी गावागावातून स्थलांतर करीत असतो व शेतकरी, गावकरी हे नेहमी दहशतीत स्वतः चा व्यवसाय करत असतात, त्याचप्रमाणे वन विभाग कार्यालय व अधिकारी यांची गत बिबट्या व गावकरी यांच्यासारखीच झाली की काय असं वाटतंय.त्यामुळे स्थलांतरित करणार्‍या वन विभागासाठी फार मोठ्या जागेची गरज नाही. तरी सामान्य लोकांना पत्ता सापडण्याच्या दृष्टीने वन विभागाचे ऑफिस हे त्वरित तहसील मध्यवर्ती शासकीय इमारतीत स्थलांतरित करावं व खाजगी जागेचे भाडे वाचवून शासनाचा आर्थिक अपव्यय टाळावा अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

COMMENTS