Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट

विदर्भात आज आणि उद्या पावसाची शक्यता

मुंबई ः राज्यातील तापमान वाढ होत असतांना दुसरीकडे हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाचे संकट व्यक्त करण्यात येत आाहे. हवामान विभागाने विर्दर्भात 18

गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, इस्रोनं दिली महत्वाची अपडेट
Aaurangabad : औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात
कसबा निवडणुकीत आचारसहिंतेचा भंग

मुंबई ः राज्यातील तापमान वाढ होत असतांना दुसरीकडे हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाचे संकट व्यक्त करण्यात येत आाहे. हवामान विभागाने विर्दर्भात 18 आणि 19 मार्च दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भाशिवाय मराठवाड्यातही 19 मार्च रोजी वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे तर काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांचा पारा 35 ते 40 पर्यंत पोहचला असतानाच दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे

COMMENTS